सुनेत्रा पवारांची राज्यसभेवर बिनविरोध निवड ! आता नणंद लोकसभेत तर,भावजय राज्यसभेत !!
मुंबई/वृत्तसेवा :
बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांच्याकडून नुकत्याच पराभूत झालेल्या सुनेत्रा अजित पवार या लोकसभेला हरल्या पण,लगेच राज्यसभेवर निवडूनही आल्या असून सुनेत्रा पवारांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे,आता नणंद (सुप्रिया सुळे) लोकसभेत तर,भावजयही (सुनेत्रा पवार) राज्यसभेत पहायला मिळणार आहे.
माजी केंद्रीय मंत्री व अजितदादा गटाचे राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या या जागेसाठी महायुतीच्या वतीने भाजपाच्या कोट्यातून सुनेत्रा पवार यांनी विधानसभेत जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला.उमेदवारी अर्ज मागे घेण्याची गुरुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत अंतिम मुदत होती.परंतु,त्यानंतर अर्ज दाखल करण्याची मुदत संपली तरी एकही अर्ज न आल्यामुळे सुनेत्रा पवारांची बिनविरोध निवड झाली.
———————————————
पक्षात कोणत्याही प्रकारची नाराजी नाही :
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला राज्यसभेची अधिकृत उमेदवारी दिली,त्याबद्दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार,इतर नेते व पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानते.
“माझ्या उमेदवारीचा निर्णय हा पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांनी मिळून घेतला आहे.माझा उमेदवारी अर्ज भरताना स्वतः छगन भुजबळ यांच्यासह पक्षातील इतर नेतेही उपस्थित होते.त्यांनी मला शुभेच्छाही दिल्या. त्यामुळे,मी ठामपणे सांगते की,पक्षात कोणत्याही प्रकारची नाराजी नाही.
– नुतन खासदार सुनेत्रा पवार
——————————————————————————