राजकीय

सांगोल्यात दीपकआबांची लवकरच जनसंवाद पदयात्रा

 

सांगोला :

सांगोला तालुक्यातील जनतेच्या सेवेत गेली ३५ वर्षाहून अधिक काळ अविरतपणे कार्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांची सांगोला तालुक्यात लवकरच जनसंवाद पदयात्रा होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मधुकर बनसोडे,  शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील,माजी नगरसेवक शिवाजी (नाना) बनकर,शिवाजीराव कोळेकर,युवकचे तालुकाध्यक्ष अनिल (नाना) खटकाळे,महिला आघाडीच्या अध्यक्षा सखुबाई वाघमारे,विद्यार्थी आघाडीचे अनिकेत सुरवसे,मोहम्मद गौस मुजावर,रवी चौगुले,चंचल बनसोडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या इतर पदाधिकाऱ्यांनी दिली.

या जनसंवाद पदयात्रेतून दीपकआबा हे तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन नागरिकांच्या व्यथा आणि समस्या जाणून घेणार असून त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.गेल्या ६० वर्षापासून सांगोला तालुक्याच्या राजकारणात साळुंखे-पाटील परिवाराची मोठी ताकद आहे.कार्यतपस्वी आमदार स्व. काकासाहेब साळुंखे-पाटील यांनी १९६५ पासून सांगोला तालुक्यातील जनतेची सेवा केली. त्यांच्यानंतर पुढे ह.भ.प.स्व.शारदादेवी साळुंखे-पाटील यांनीही समाजसेवेचा हाच विचार व वारसा पुढे सुरु ठेवला.तर,माजी आमदार दीपकआबांनी १९९० पासून निरंतर समाजसेवेची परंपरा पुढे सुरु ठेवली आहे.सत्ता व पद असो किंवा नसो,साळुंखे-पाटील परिवारावर प्रेम करणारी आणि विश्वास असणारी जनता हीच आपली संपत्ती या न्यायाने निरपेक्ष भावनेने दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी नेहमीच सांगोला तालुक्याच्या विकासात सिंहाचा वाटा उचलला आहे. वर्षानुवर्षे रखडलेले प्रश्न चुटकीसरशी मार्गी लावणे हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे.

कायम जनतेच्या गराड्यात असलेले माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील हे आता प्रत्यक्ष जनतेत जाऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत व त्यांच्या समस्या जाणून घेणार असून लवकरच या जनसंवाद पदयात्रेची तारीख व मार्ग ठरवण्यात येणार असल्याची माहिती ज्येष्ठ नेते तानाजीकाका पाटील यांनी दिली.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button