राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी सांगोल्यात विविध कार्यक्रम संपन्न

सांगोला :

                        १० जून १९९९ रोजी स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रौप्यमहोत्सवी म्हणजेच २५ व्या वर्धापनदिनी माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या सांगोला येथील (राष्ट्रवादी भवन) संपर्क कार्यालयात १० जून रोजी सकाळी १० वा.१० मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात आले. तसेच भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात येवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यातील ग्रामीण भागात विविध सामाजिक उपक्रम राबवून वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.

             यावेळी राष्ट्रवादीचे विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष शिवाजीराव कोळेकर,शहराध्यक्ष तानाजी (काका) पाटील,राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष अनिलनाना खटकाळे,राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा सखुबाई वाघमारे,विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षा सुचिताकाकी मस्के,माजी नगराध्यक्ष अनिलभाऊ खडतरे,माजी नगरसेवक शिवाजी बनकर व सतीश सावंत,ॲड.संपतराव पाटील,दिलीपकाका मस्के,माजी उपसरपंच सुनील गायकवाड,साखर कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन विश्वनाथ (नाना) चव्हाण,तुकाराम आळसुंदकर,बिरा बंडगर,चंद्रकांत शिंदे,सूर्याजी खटकाळे,गिरीश गायकवाड,विजय गंभीरे,कार्याध्यक्ष संभाजी हरिहर,माजी सरपंच संतोष पाटील,प्रवक्ते महादेव कांबळे,वस्ताद बंडगर,बिरा गेजगे,रामदास काळे,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल सुरवसे,अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद गौस मुजावर,प्रांतिक सदस्य सतीश काशीद,हंगिरगेचे माजी सरपंच सुरेश काटे, नितीन सावंत,युवकचे शहराध्यक्ष रवी चौगुले,ज्ञानेश्वर शिंदे,महादेव शिंदे,विनोद रणदिवे,पोपट खाटीक, अस्लम पटेल आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————————————————————