एलसीबीच्या ख्वाॅजा मुजावरना मिळाली बढती अन् बनले फौजदार
सोलापूर :
सोलापूर ग्रामीण पोलीस अंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) शाखेतील सहाय्यक फौजदार ख्वाॅजा मुजावर यांना खात्यांतर्गत बढती मिळाल्यामुळे ते आता फौजदार (पी.एस.आय.) बनले असून त्यांना मिळालेल्या बढतीमुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी सोलापूर ग्रामीण पोलीसांमधील तब्बल ३७ सहाय्यक फौजदारांना खात्यांतर्गत पदोन्नती देवून त्यांची फौजदार (पी.एस.आय.) म्हणून नियुक्ती केली असून त्यामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) शाखेतील सहाय्यक फौजदार ख्वाॅजा मुजावर यांचाही समावेश आहे.
नुतन फौजदार ख्वाॅजा मुजावर हे यापूर्वी सांगोला पोलीस ठाण्यात कार्यरत असताना त्यांनी उत्तम कामगिरी बजावली असून सर्वच क्षेत्रातील लोकांशी चांगला संपर्क ठेवून त्यांनी सांगोला शहर व तालुक्यात अनेक मित्र बनवले होते.त्यांना मिळालेल्या पदोन्नतीमुळे त्यांच्या सांगोल्यातील मित्रपरीवारानेही आनंद व्यक्त केला आहे.
———————————————————————————