सांगोला :
युवासेनेचे तालुकाप्रमुख दीपक उर्फ गुंडादादा खटकाळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सांगोला तालुक्यातील वाटंबरे ग्रामस्थांच्या वतीने वाटंबरे येथे माण नदीच्या तीरावरील दत्त मंदिर परिसरात नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले.
सदर वृक्षारोपण कार्यक्रमावेळी वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष लागवड करण्यात आले.यामध्ये प्रामुख्याने चिंच,जांभूळ,वड,पिंपळ,आंबा आदी वृक्ष लावण्यात आले.या वृक्षांना संजीवनी देण्यासाठी स्वतंत्र अशी ठिबक सिंचनाची व्यवस्था करण्यात आली.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवासेना जिल्हा संपर्क प्रमुख सागरदादा पाटील हे होते.वाढदिवसाचे औचित्य साधून केलेल्या वृक्षलागवडीच्या या सामाजिक कार्याबद्दल गुंडादादा खटकाळे यांनी ग्रामस्थांचे आभार मानले.
याप्रसंगी गुंडादादा खटकाळे,महादेव बापू पवार, सरपंच नामदेव पवार,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विकास पवार,चेअरमन नाना पवार,ग्रा.पं. सदस्य खंडू पवार,माजी सरपंच आसिफ मुलाणी, धीरज पवार,संजय पवार,राहुल शेठ,विनायक पवार, ग्रा.पं.सदस्य आरमान मुलाणी तसेच युवा कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
———————————————————————————
More Stories
विद्यार्थ्यांना मोबाईल व समाज माध्यमांपासून दूर ठेवणे ही काळाची गरज – सहाय्यक प्रांतपाल डॉ.कैलास करंडे
गावागावात,क्लस्टर स्तरावर शेतमाल खरेदी केंद्रांचे जाळे विस्तारुन ‘प्राईस डेफिशियन्सी पेमेंट’सारखी प्रणाली लागू करावी – खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांची केंद्र सरकारकडे मागणी
सांगोला येथील भारतीय स्त्री शक्ती संस्थेला राज्य महिला आयोगाचा राज्यस्तरीय पुरस्कार