मुंबई : टेरर फंडींग व कँप चालवल्याप्रकरणी पाॅप्युलर फ्रंट आँफ इंडिया (पीएफआय) या संघटनेच्या देशभरातील विवीध शहरातील कार्यालयावर ED व NIA या तपास यंत्रणांकडून संयुक्तपणे छापेमारी करुन तब्बल शंभरहून अधिक संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून या कारवाईच्या विरोधात पीएफआयचे कार्यकर्ते आक्रमकपणे आंदोलन करित आहेत.
गुरुवारी पहाटेपासून ED व NIA या तपास यंत्रणांनी पीएफआय च्या केरळ,तामिळनाडू व उत्तर प्रदेशासह देशातील दहा राज्यातील राज्य व जिल्हास्तरिय नेत्यांच्या घरांवर छापे मारुन सुमारे शंभर जणांना अटक केली. पीएफआयचे अध्यक्ष ओएमए सलाम हे ED व NIA च्या रडारवर असल्याने त्यांच्या मलप्पुरम जिल्ह्यातील मंजेरी येथील घरावर अचानक मध्यरात्रीच छापा टाकून त्यांना ताब्यात घेण्यात आले.
एनआयएने पीएफआय या संघटनेच्या तामिळनाडूतील कुड्डालोर, कोईम्बतूर,रामनाद,दिंडुगल,थेनी व थेनकसीसह इतर ठिकाणच्या पदाधिकार्यांच्या घरांची झडती घेवून त्यांना ताब्यात घेतले. पीएफआयच्या
चेन्नईस्थित पुरसवक्कम येथील राज्य मुख्य कार्यालयातही झडती घेण्याचे काम अद्याप सुरु आहे.
More Stories
सांगोल्यातील दहावीच्या पेपर चोरीच्या गुन्ह्यात मुद्देमालासह अल्पवयीन आरोपी ताब्यात
दागिने व मोटार सायकल चोरी करणार्या सराईत गुन्हेगारास पकडण्यात सांगोला पोलीसांना यश
तब्बल २५ तोळे सोन्यासह आरोपीला पकडण्यात सांगोला पोलीसांना यश