महाराष्ट्र

प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे सांगोल्यात कम्युनिटी ट्रेनिंग सेंटर सुरु

 

सांगोला :

                    प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे सांगोला तालुक्यातील १५ गावांसाठी येत्या १५ डिसेंबरपासून कम्युनिटी ट्रेनिंग सेंटर सुरु करण्यात येत असून या माध्यमातून तालुक्यातील बेरोजगारांना प्रशिक्षणाची संधी मिळेल,अशी माहिती प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनचे तालुका समन्वयक बापूसाहेब ठोकळे यांनी दिली.

प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे या उपक्रमांतर्गत अटॉमोटीव्ह फोर व्हिलर मेकॅनिक हा एक महिन्याचा कोर्स मोफत सुरु करण्यात येणार असून हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर एकूण १५ दिवसांचे ॲडव्हान्स प्रशिक्षण कोल्हापूर येथे देण्यात येणार आहे.तरी,इच्छुक असलेल्या उमेदवारांनी संपर्क साधावा,असे आवाहन बापूसाहेब ठोकळे यांनी केले आहे.
—————————————————————————
कम्युनिटी ट्रेनिंग सेंटर सुरु करण्यात येणारी १५ गांवे :

          कमलापूर,वाढेगाव,सावे,बामणी,देवळे,मेथवडे, संगेवाडी,अजनाळे,वाटंबरे,चिंचोली,कडलास,मेडशिंगी, एखतपुर,अकोला व वासूद या गावांमधील तरुणांना या कोर्ससाठी प्राधान्याने प्रवेश मिळेल.——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button