क्राईम

अबब,जवळा ग्रामपंचायतच्या कार्यालयातून चक्क टेबल,खुर्चीचीही चोरी

 

सांगोला :

सध्या चोर्‍यांचे प्रमाण वाढले असून चोर कशाची चोरी करेल ? हे मात्र कांही सांगता येत नाही.घरातील सोने, चांदी,पेसे,कपडालत्ता चोरीला गेले,हे यापूर्वी सर्रास ऐकायला मिळायचे. आता अलिकडे मोबाईल व दुचाकी चोरीचेही प्रमाण वाढले आहे.पण,हेच चोर टेबल,खुर्चीही चोरुन नेतात,हे ऐकून थोडंस आश्चर्यच वाटेल.परंतु, हे खरे असून,सांगोला तालुक्यातील जवळा ग्रामपंचायत कार्यालयातून चोरांनी चक्क टेबल,खुर्चीचीच चोरी केली असल्याची फिर्याद सांगोला पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

                   जवळा (ता.सांगोला) येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी टेबल,खुर्ची व सीसीटीव्ही डिव्हीआर असे एकूण सुमारे २९ हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरुन नेले असल्याची घटना घडली असून याप्रकरणी जवळा येथील ग्रामसेवक दत्तात्रय रसाळ यांनी अज्ञात चोरट्यांविरोधात सांगोला पोलीसात फिर्याद दिली आहे.फिर्यादी रसाळ हे ग्रामसेवक म्हणून जवळा व तरंगेवाडी येथे कार्यरत आहेत.२४ नोव्हेंबर रोजी फिर्यादी हे सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालय,जवळा याठिकाणी कामकाज करुन दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास कार्यालय बंद करुन गावी गेले. २५ नोव्हेंबर रोजी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांना ग्रामपंचायतचे शिपाई यांच्या मुलाने फोन करून सांगितले की,जवळा ग्रामपंचायत कार्यालयाचे बाहेरील दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसत आहे.तेंव्हा,फिर्यादी यांनी त्यास आतमध्ये जावून पहायला सांगितले असता, कार्यालयातील शशिकांतभाऊ देशमुख यांचे नांव टाकलेला लाकडी टेबल,गोल आकाराची खुर्ची व सीसीसीटीव्ही, डिव्हीआर इ.साहित्य नसल्याचे त्याने फिर्यादी यांना फोन करुन सांगितले.

त्यानंतर,फिर्यादी हे पावणे दहा वाजण्याच्या सुमारास जवळा ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचले असता,समोरील दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले.आतमध्ये जावून पाहिले असता,सुमारे १० हजार रुपये किंमतीचा १ टेबल,सुमारे १० हजार रुपये किंमतीची १ खुर्ची व सुमारे ९ हजार रुपये किंमतीचे एक सीसी टीव्हीचा डिव्हीआर असे एकूण २९ हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरीस गेल्याचे दिसून आल्याने तशा आशयाची फिर्याद त्यांनी दिली.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button