जय मल्हार क्रांती संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी उमेश मंडले यांची फेरनिवड
सांगोला :
जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष लोकनेते दौलतनाना उमाजी शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली व उपाध्यक्ष अंकुशराव जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली सस्तेवाडी (ता.फलटण,जि. सातारा) येथे पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सांगोला प्रहार न्यूज पोर्टलचे संपादक,पत्रकार उमेश मंडले यांची सोलापूर जिल्हाध्यक्ष (दक्षिण) म्हणून फेरनिवड करण्यात आली.
जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक,अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांच्या हस्ते पत्रकार उमेश मंडले यांना निवडीचे पत्र देवून गौरविण्यात आले.पत्रकार उमेश मंडले यांनी पत्रकारितेच्या व संघटनेच्या माध्यमातून गेल्या १० वर्षांपासून मोठे संघटन उभे करून चांगल्याप्रकारे काम केल्यामुळे त्यांची जय मल्हार क्रांती संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष (दक्षिण) म्हणून फेरनिवड करण्यात आली आहे. पत्रकार उमेश मंडले हे दौलतनाना शितोळे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. संघटनेच्या स्थापनेपासून दौलतनाना शितोळे यांच्यासोबत राहून समाज संघटित करून समाजातील गोरगरीब कुटुंबांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
जय मल्हार क्रांती संघटनेच्या सांगोला तालुकाध्यक्षपदी असताना झालेल्या माढा लोकसभेच्या निवडणुकीत उभे असलेले अपक्ष उमेदवार दौलतनाना शितोळे यांचा निवडणूक प्रतिनिधी म्हणून काम करण्याचा बहुमान उमेश मंडले यांना मिळाला होता.
—————————————————————————