सांगोला :
विज्ञान महाविद्यालय,सांगोला येथे मंगळवारी ६ जून रोजी सकाळी १० वाजता जिमखाना डे व पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
महाराष्ट्र राज्य प्राचार्य संघटनेचे माजी अध्यक्ष व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.जमादार के.एम.यांनी यावेळी बोलताना सांगितले की, कै.डॉ.गणपतराव देशमुख यांचे नांव महाराष्ट्रभर आदराने घेतले जाते, त्यांच्या महाविद्यालयामध्ये विचार व्यक्त करण्याचे भाग्य मला लाभले, याचा मला मनस्वी आनंद होत आहे. माणसे जुळवत गेल्यास देश व समाज एकत्र येत जातो,असे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना कार्यक्रमाचे पाहुणे व सांगोल्याचे नुतन तहसीलदार संजय खडतरे यांनी सांगितले की, माझा व विज्ञान महाविद्यालयाचा जुना व खूप दिवसांचा ऋणानुबंध आहे, त्यामुळॆ जिमखाना डे व पारितोषिक वितरण कार्यक्रमास मी आवर्जून उपस्थित राहिलो असल्याचे सांगीतले.यावेळी, कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे संचालक चंद्रकांतदादा देशमुख म्हणाले की,ग्रामीण भाग आणि शहरी भाग मोबाईलमुळे एकत्र होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सोय व्हावी व त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे,यासाठी महाविद्यालयाची स्थापना केली आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सिकंदर मुलाणी म्हणाले की, ग्रामीण भागातील गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी महाविद्यालय व संस्था प्रयत्नशील आहे.यावेळी त्यांनी नवीन शैक्षणिक धोरण व गुणवत्तावाढ याविषयी सखोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी, महाविद्यालयातील गुणवंत प्राध्यापक सर्वश्री प्रा.बी.डी. कोकरे,डॉ.किसन माने,डॉ.आदलिंगे एन.पी.,डॉ.रुपनर पी.जे.,डॉ.गडहिरे आर.टी व डॉ.राजेंद्र सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रा.कोकरे बी.डी.लिखित चार पुस्तकांचा प्रकाशन सोहळाही यावेळी संपन्न झाला.तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरणाचा व सत्कार समारंभाचा कार्यक्रम पार पडला.यासमयी,प्रा.विजय पवार यांनी जिमखाना अहवाल वाचन केले तसेच खेळामध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यापीठाकडून राष्ट्रीय स्तरावर महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.तसेच बौद्धिक आणि सांस्कृतिक स्पर्धेमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.
प्रारंभी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमानंतर दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार समारंभ पार पडला. महाविद्यालयाचे अहवाल वाचन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.कोळवले एच.डी.यांनी केले.सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव विठ्ठलराव शिंदे सर,संस्थेचे संचालक दिपकराव खटकाळे सर,संस्थेचे संचालक डॉ. अशोक शिंदे सर, समन्वयक डॉ.शंकरराव धसाडे व अनेक मान्यवर उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ.रुपनर पी.जे.यांनी तर,कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. किसन माने व प्रा. निसार शेख यांनी केले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सिकंदर मुलाणी यांच्या मार्गदर्शनखाली महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,चतुर्थश्रेणी कर्मचारी व विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी अथक परिश्रम घेतले.
—————————————————————————
More Stories
मुलींनी परदेशात जाऊन उच्चशिक्षित व्हावे – डॉ.शिवानी महेश आसबे
अजनाळे येथील अभिनव पब्लिक स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न
माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानतर्फे किशोरी साठी ‘प्रेम,मैत्री व आकर्षण’ कार्यक्रम संपन्न