सांगोला :
संसदेच्या नवीन इमारतीला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव देण्यात यावे,अशी मागणी करणारे निवेदन आरपीआय तालुका अध्यक्ष व माजी नगरसेवक सुरजदादा बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली सांगोला तालुका बहुजन बांधवांच्या वतीने तहसीलदार यांना नुकतेच देण्यात आले.
सावरकर यांच्या जयंती दिवशी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर व महिला शिक्षणाची जननी सावित्रीबाई फुले यांचा पुतळा हटवल्याच्या निषेधार्थ बहुजन बांधवांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येवून संसदेच्या नवीन इमारतीला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव देण्यात यावे,तसेच संसदेतील राजदंडावर पूर्वी असलेल्या अशोक स्तंभाच्या प्रतिमेची स्थापना करण्यात यावी,अशा मागणीचे निवेदन बहुजन बांधवांच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले.
यावेळी बोलताना माजी नगरसेवक सूरजदादा बनसोडे म्हणाले की,२८ मे रोजी दिल्ली येथे नवीन बांधलेल्या संसद भवनाच्या इमारतीचा उदघाटन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला. तो लोकार्पण सोहळा संविधानाला व लोकशाहीला अनुसरुन झालाच नाही. देशाचे संविधान हे धर्मनिरपेक्ष असून त्यामध्ये धर्माला मान्यता नाही. राजदंड (संगोल) हे लोकशाहीचे प्रतीक नसून ते राजेशाही व हुकूमशाहीचे प्रतीक आहे,ते लोकशाहीला मान्यच नाही.ते पुढे म्हणाले की,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव संसदेला द्यावे,ही मागणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आमच्या जातीचे आहेत म्हणून नांव द्यावे,असा आमचा आग्रह नाही.कारण डाॅ. बाबासाहेबांनी या देशाला दिलेल्या संविधानामुळेच भारत देशामध्ये अनेक जाती,अनेक धर्म,अनेक पंथ,अनेक प्रांत, विविध भाषा व विविध राज्ये आहेत.तरीपण, देशाच्या स्वातंत्र्यापासून ७५ व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनापर्यंत हा देश फक्त देशाच्या संविधानामुळे एकसंघ टिकून राहिला आहे. देशाचे संसदीय कामकाज हे फक्त आणि फक्त संविधानावर चालते आणि त्या संविधानाचे जनक हे भारताचे पहिले कायदामंत्री भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. देशाची लोकशाही अखंड टिकवायची असेल व संपूर्ण जगापुढे भारत देश हा खरा लोकशाहीचा आहे,हे जगासमोर दाखवायचे असेल तर,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव नवीन संसदेच्या इमारतीला दिल्यासच ते सिध्द होणार आहे.म्हणून या देशाच्या संसदेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर नांव हेच शोभनीय आहे. तेलंगणा राज्यामध्ये नवीन बांधलेल्या विधानभवनाच्या इमारतीला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव देऊन हा देश व शासन लोकशाही पुरस्कृत आहे व हा देश संविधानावर चालतो,हे पूर्ण जगाला दाखवून दिले आहे. शिवाय, २८ मे रोजी सावरकर यांची जयंती दिल्लीच्या महाराष्ट्र सदनामध्ये साजरी करताना कांही जातीयवादी धर्मांध शक्तीच्या मानसिक प्रवृत्तीने ग्रासलेल्या मनोवृत्तीने महिला शिक्षण उध्दारक सावित्रीबाई फुले व पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटवणे हे अतिशय निंदनीय असून, या देशांमध्ये मनुस्मृति येण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून अशा घटनेचा निषेध करावा, परंतु महापुरुषांचे अवमान करणाऱ्या मानसिकतेला त्या महापुरुषांच्या समाजाकडून व नेतेमंडळी कडून कसलीही प्रतिक्रिया दिली जात नाही, शिवाय निषेधही केला जात नाही,ही त्या समाजाची की महापुरुषांची शोकांतिका म्हणावी ? हेच कळत नाही.महापुरुषांच्या अवमानाविषयी आपण जर साधी प्रतिक्रियाही देऊ शकत नसेल तर,त्या महापुरुषांची जयंती साजरी करण्याचा नैतिक अधिकार आपणास आहे का ? याचे आत्मचिंतन करणे ही काळाची गरज आहे. म्हणून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करुन ज्यांनी कोणी हे पुतळे हटवले आहेत,अशा या मनूवादी प्रवृत्तीबाबत योग्य ती चौकशी करून कारवाई करण्यात यावी. शासनाने या निवेदनाचा गांभीर्याने विचार न केल्यास या आंदोलनाने महाराष्ट्रासह देशभरामध्ये उग्र स्वरूपाचे रूप धारण केल्यास याची पूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील,अशा मागणीचे निवेदन आरपीआयचे तालुकाध्यक्ष व नगरसेवक सुरजदादा बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली बहुजन बांधवांच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे,धनगर समाजाचे नेते उल्हास धायगुडे,होलार समाजाचे नेते व कमलापूरचे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश उर्फ पप्पू ऐवळे,मुस्लिम समाजाचे इर्शाद बागवान,ॲड.खाडे मॅडम यांनी आपले विचार व्यक्त केले.सदर निवेदन देतेवेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष तानाजी बनसोडे,रेग्युलर जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष सचिन सावंत,संभाजी ब्रिगेडचे भाई राजू मगर,माजी नगरसेवक अस्मिर तांबोळी, काँग्रेसचे शहराध्यक्ष तोहिद मुल्ला,तौफिक मुजावर, बीएसपीचे नेते कुंदन बनसोडे,मिलिंद बनसोडे, सिताराम बनसोडे,पोपट तोरणे,गुणवंत जगधने, चंद्रकांत काटे,लखन माने,वैभव बनसोडे,देवराज बनसोडे,पंकज बनसोडे,स्नेहल लोखंडे,विजय (महिबूब) बनसोडे,सुनील (लकी) कांबळे,दारासिंग ढावरे,दिग्विजय बनसोडे,भीमराव बनसोडे,विशाल ठोकळे,सुधाकर बनसोडे,ग्रा.पं.सदस्य विनायक तोरणे,ऋनील चंदनशिवे,अक्षय चंदनशिवे,नागसेन चंदनशिवे,लक्ष्मण चंदनशिवे,अनील चंदनशिवे,भारत चंदनशिवे,दत्ता जावीर,शुभम ऐवळे,बाळू भजनावळे, सचिन धांडोरे,नितीन रणदिवे,योगेश देवकुळे,माणिक सकट,अर्जुन चंदनशिवे,मच्छिंद्र चंदनशिवे,विशाल गुळीग,बापू सरवदे,बाळा ठोकळे,आर्यन गोपीचंद,शंकर लांडगे,अविनाश लांडगे,विनायक गंगणे,विशाल जगधने,सचिन गेजगे,चंदू मोरे,मंगल ठोकळे,अजय जगधने,मोहन सूर्यगंध,बंडू माने,सिद्धार्थ भडकुंबे,दत्ता वाघमारे,रजनीकांत सूर्यगंध,प्रवीण वाघमारे,अतुल गस्ते,अविनाश जगधने,सचिन चंदनशिवे,संतोष चंदनशिवे,बाळू जोडगे,सचिन उबाळे,दीपक होवाळ, समाधान होवाळ (मेंबर),समाधान (बापू) होवाळ, अमित कांबळे,सुंदर काटे,सागर हेगडे,अनिल होवाळ, राजू होवाळ,दादासो होवाळ,संदीप गोतसुर्य,सुरज सोनी,बंटी होवाळ,पंकज ठोकळे,यश गोतसूर्य,दिनकर कांबळे,भागवत कांबळे,मंगेश बाबर,सुशांत कांबळे, शशिकांत बाबर, प्रीतम कांबळे,ऋषिकेश काटे,आकाश वाघमारे,प्रणय बाबर व बहुजन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————————————————————
More Stories
भारत-संयुक्त अरब अमिराती संसदीय मैत्री समितीवर खा.धैर्यशील मोहिते-पाटील
सांगोला तालुक्यातील जि.प.व पं.स.च्या अनेक उमेदवारांचा खा.मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
डॉ.परेश खंडागळे यांचे बंधूही लढवणार नगरपालिकेची निवडणूक