सांगोला :
राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री नाम.एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव व शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे नांव घेताच खास.संजय राऊत हे थुंकले तसेच त्यांनी प्रसार माध्यमांबाबत बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ सांगोला तालुका शिवसेना,युवा सेना व आमदार शहाजी बापू पाटील विचार मंच यांच्यावतीने सांगोला येथील वासूद चौकात खा.संजय राऊत यांच्या प्रतिमात्मक पुतळ्याला “जोडे मारो आंदोलन” करुन निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी “अरे या संजय राऊताचे करायचे काय ? खाली मुंडके आणि वर पाय” .. “धिक्कार असो,धिक्कार असो,संजय राऊताचा धिक्कार असो” अशा घोषणा देऊन खा.राऊतांचा निषेध व्यक्त केला.
यावेळी,शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे,युवा सेना तालुका प्रमुख गुंडादादा खटकाळे,उद्योगपती अभिजीत नलवडे,माजी नगरसेवक सोमेश यावलकर,संजय मेटकरी, बाळासाहेब आसबे,माजी पं.स.सदस्य सुभाष इंगोले,पांडुरंग मिसाळ,अजिंक्य शिंदे,संजय गव्हाणे,धीरज पवार,सचिन काळे,पप्पू इंगोले, दीपक दिघे,दीपक पवार,आदित्य नागणे, अजय सुरवसे,अक्षय पवार यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबाबत माध्यमाशी बोलताना शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे खा.संजय राऊत हे खा.श्रीकांत शिंदे यांचे नांव घेताच थुंकले होते.त्यांच्या या कृतीमुळे शिंदे गटाच्या शिवसेनेतून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असून खा.राऊत यांच्या या कृतीचा सर्वत्र निषेध केला जात आहे.
सांगोल्यातही खा.संजय राऊत यांच्या प्रतिमात्मक पुतळ्याला “जोडे मारो आंदोलन” करुन निषेध व्यक्त करण्यात आला.
————————————————
खा.संजय राऊतांच्या मेंदूला पॅरालिसीसचा आजार :
खा.संजय राऊतांच्या मेंदूला पॅरालिसीसचा आजार झाला आहे, त्यामुळे त्यांच्यावर लवकर उपचार करणे गरजेचे आहे.अन्यथा, हा माणूस रस्त्यावर उभा राहून दगड मारायला कमी करणार नाही.उद्धव ठाकरे,काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना आम्ही विनंती करतो की,सांगोला तालुक्यात आम्ही चांगल्या पद्धतीने डागण्याचे काम करतो,तुमची परवानगी असेल तर, संजय राऊतांना सांगोला तालुक्यातील शिवसैनिकांच्या स्वाधीन करा,त्यांच्या मेंदूला चांगल्या पध्दतीने डागण्या देऊन उपचार करु व भविष्यात ते अशी बेताल वक्तव्ये करणार नाहीत,याची आम्ही काळजीही घेऊ. – तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे
——————————————————————————
More Stories
भारत-संयुक्त अरब अमिराती संसदीय मैत्री समितीवर खा.धैर्यशील मोहिते-पाटील
सांगोला तालुक्यातील जि.प.व पं.स.च्या अनेक उमेदवारांचा खा.मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
डॉ.परेश खंडागळे यांचे बंधूही लढवणार नगरपालिकेची निवडणूक