सांगोला :
सांगोला येथील शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता डिप्लोमा इंजीनियरिंग प्रवेश प्रक्रियेला दि.१ जून २०२३ पासून सुरुवात झाली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष बी.आर.गायकवाड व प्राचार्य डॉ.आर.ए.देशमुख यांनी दिली.
प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी सुविधा केंद्राला (६४७१) मान्यता मिळाली असून गुरुवार दि.१ जून पासून ऑनलाइन प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणी व अर्ज निश्चिती या प्रक्रिया सुरु झाल्या आहेत. यावर्षीही दहावीच्या निकालापूर्वीच प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे. विद्यार्थ्यांना फक्त दहावीच्या परीक्षेचा आसन क्रमांक टाकून प्रवेश अर्ज भरता येणार आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना जन्म प्रमाणपत्र किंवा रहिवाशी दाखला आवश्यक आहे,अशी माहिती प्राचार्य डॉ.आर.ए.देशमुख यांनी दिली.
विद्यार्थी दि.१ जून ते २१ जून या कालावधीत प्रवेश प्रक्रियेसाठी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावरून अर्ज छाननीची योग्य पध्दत निवडून ऑनलाइन नोंदणी करणे,कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे तसेच आपल्या प्रवर्गासाठी कागदपत्रांची पडताळणी करून आपला प्रवेश अर्ज निश्चित करु शकतात. दि.२३ जून रोजी मंडळाच्या संकेतस्थळावर तात्पुरत्या गुणवत्ता याद्या प्रदर्शित करण्यात येतील. विद्यार्थी त्यांच्या प्रवेश अर्जात कांही त्रुटी असल्यास दि.२४ जून ते २७ जून या दरम्यान दुरुस्त्या करुन घेऊ शकतात. मंडळाच्या संकेतस्थळावर दि.२९ जून रोजी अंतिम गुणवत्ता याद्या प्रदर्शित करण्यात येतील.सांगोला, जत,मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक यांच्यासाठी प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन संबंधित कागदपत्रे जमविताना येणाऱ्या अडचणी व शंका याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज,सांगोला येथे सुविधा केंद्र असून याचा फायदा पालकांनी घ्यावा,असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री.बी.आर.गायकवाड यांनी केले.
शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजचे हे १५ वे वर्ष असून कॉलेजने आपली उज्वल यशाची परंपरा कायम राखली असून येथून उत्तीर्ण होऊन बाहेर पडणारे विद्यार्थी हे एक परिपूर्ण इंजिनियर किंवा व्यावसायिक होऊन बाहेर पडतात. कॉलेजमध्ये असणाऱ्या उपलब्ध सुविधा, शिक्षणाचा दर्जा,शिस्त या गोष्टीमुळे पालकांची नेहमीच शिवाजी पॉलिटेक्निकला पसंती राहिली आहे. सन २०२३- २४ च्या प्रवेश प्रक्रियेसाठी शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमधील सुविधा केंद्रातील सर्व यंत्रणा सज्ज असून विद्यार्थ्यांनी व पालकांनी प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी सुविधा केंद्र प्रमुख प्रा.जी.एस.भोसले यांच्याशी (मोबा.नं. ९८८१७४२४७८) संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य डॉ.आर.ए.देशमुख यांनी केले आहे.
—————————————————————————
More Stories
माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानतर्फे किशोरी साठी ‘प्रेम,मैत्री व आकर्षण’ कार्यक्रम संपन्न
मरायला नाही तर,जगायला खूप हिंमत लागते – प्रा.डॉ.सुनिता बोर्डे-खडसे
अभिनव पब्लिक स्कूलमध्ये ‘अभिनव बिग बझार’ उपक्रम उत्साहात संपन्न