सांगोला :
स्वत:च्याच मायभूमीत तहसीलदार पदावर विराजमान होण्याचा मान मिळणे म्हणजे,नशीबच म्हणावे लागेल आणि जन्मगांवीच तहसीलदार पदावर विराजमान होण्याचा असा मान पहिल्यांदाच सांगोल्यातील संजय खडतरे यांना मिळाला असून सांगोल्याचे तहसीलदार म्हणून संजय खडतरे यांनी सोमवारी ५ जून रोजी पदभार स्विकारला आहे.
ज्या तहसील कार्यालयात कारकून व अव्वल कारकून म्हणून काम केले त्याच,तहसील कार्यालयात तहसीलदार पदाचा पदभार घेताना नुतन तहसीलदार संजय खडतरे यांच्या चेहर्यावर आनंद व उत्साह ओसंडून वाहत होता.यापूर्वी, पुणे जिल्ह्यातील मावळ व पुणे शहरात नायब तहसीलदार म्हणून त्यांनी काम केलेले असून पदोन्नतीवर त्यांची सांगोला येथे तहसीलदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.पदभार घेतेवेळी निवासी नायब तहसीलदार किशोर बडवे,गांव कामगार तलाठी हरिश्चंद्र जाधव,विकास माळी व इतर कर्मचारी उपस्थित होते.
——————————————————————————
More Stories
गावागावात,क्लस्टर स्तरावर शेतमाल खरेदी केंद्रांचे जाळे विस्तारुन ‘प्राईस डेफिशियन्सी पेमेंट’सारखी प्रणाली लागू करावी – खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांची केंद्र सरकारकडे मागणी
जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोले नगरपरिषदेचा दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर