सोलापूर

सोलापूर सुरमणी मोहंम्मद अयाज यांची “सोलापूरचे ब्रँड अम्बॅसिडर” म्हणून निवड

सोलापूर :

             सोलापूरचे ख्यातनाम गायक तथा महाराष्ट्राचे महागायक विजेते मोहंम्मद अयाज यांची “सोलापूरचे ब्रँड अम्बॅसिडर” म्हणून नुकतीच निवड करण्यात आली असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे हस्ते त्यांना “सोलापूर ब्रँड अम्बॅसिडर” निवडीचे पत्र देण्यात आले आहे.

मोहंम्मद अयाज यांनी कलाक्षेत्रात आजपर्यंत केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची ही निवड करण्यात आली असून मो.अयाज यांनी कलेच्या माध्यमातून आपल्या सोलापूर जिल्ह्याचे देश-विदेशात नांवलौकीक केले. कला,सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली आहे.सोलापूर जिल्हा व्यसन मुक्ती व राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीसाठी आता मोहंम्मद अयाज हे आपल्या कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणार आहेत.संगीत जगतचे गुरुवर्य पंडीत र्‍हदयनाथ मंगेशकर यांच्या साम गुरुकुल या रियालिटी सिंगींग शो मध्ये जेव्हा मोहंम्मद अयाज हे महाराष्ट्राचे महागायक विजेते ठरले, तेंव्हाच त्यांना “सोलापूर सुरमणी” ही उपाधी देऊन गौरविण्यात आले.

              कलाक्षेत्रातील कार्याची दखल घेवून सोलापूर जिल्हा प्रशासनानेही एका सामान्य कलावंतास ही ब्रँड अम्बॅसिडरची उपाधी देऊन सन्मानित केले,ही बाब माझ्या साठीच नव्हेतर, माझ्या समस्त सोलापूर रसिकांसाठी सुध्दा अभिमानास्पद आहे.जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर साहेब व सीईओ दिलीप स्वामी साहेब,निवासी उपजिल्हाधिकारी शमाताई पवार, समाजकल्याण अधिकारी सुनिल खामीतकर व सोलापूर प्रशासनाचा मी सदैव ऋणी राहीन, प्रशासन माझ्यावर जी कांही जबाबदारी देईल,ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करेन,अशी प्रतिक्रिया मोहंम्मद अयाज यांनी यावेळी दिली.

यावेळी मोहम्मद अयाज यांनी “एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तो, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तो” हे गीत सादर करुन आपली भावना व्यक्त केली. याप्रसंगी, महाराष्ट्र राज्य समन्वयक अनुष्का शर्मा,ओरिसाचे राज्य समन्वयक अभिनव घोलप,जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनिल खामितकर यांचेसह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button