राजकीय

सांगोला शहरातील वाड्यावस्त्यांवर सिंगल फेजचा विद्युत पुरवठा करावा, या मागणीसाठी माजी नगरसेवक सतिश सावंत यांचा २४ मे रोजी रास्ता रोको आंदोलन

 

सांगोला :

            सांगोला शहरातील रेल्वे गेटच्या पश्‍चिमेकडील जानकर वस्ती,नरुटे वस्ती व पंढरपूर रोडवरील देशमुख वस्तीच्या पश्‍चिमेकडील नाथा सरगर वस्ती (देशमुख वस्ती),पांडुरंग माने वस्ती,दगडू जानकर वस्ती या वाड्यावस्त्यांवरील नागरिकांना शहराप्रमाणेच सिंगल फेजचे नवीन ट्रान्सफार्मर बसवून वीज पुरवठा करावा अन्यथा बुधवार दि.२४ मे रोजी सकाळी १० वा.मिरज-पंढरपूर हायवेवर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर वाड्यावस्त्यांवरील नागरिकांसह रास्ता रोको आंदोलन करणार असल्याबाबतचे निवेदन माजी नगरसेवक सतिश सावंत यांनी महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांसह लोक प्रतिनिधींना दिले आहे.

सांगोला शहरातील रेल्वे गेटच्या पश्‍चिमेकडील जानकर वस्ती,नरुटे वस्ती व पंढरपूर रोडवरील देशमुख वस्तीच्या पश्‍चिमेकडील नाथा सरगर वस्ती (देशमुख वस्ती),पांडुरंग माने वस्ती,दगडू जानकर वस्ती हा भाग शहरात असून या भागात नागरिक मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. परंतू,या भागात शहराप्रमाणे सिंगल फेजचा विद्युत पुरवठा न करता ग्रामीण प्रमाणे विद्युत पुरवठा केला जातो.त्यामुळे, या भागातील नागरिकांना केवळ ८ तासच विद्युत पुरवठा होतो,तोही कमी दाबाने होत असल्यामुळे नागरिकांच्या घरातील फ्रिज,कुलर,फॅन यासह इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक होत आहेत.

यापूर्वीही शहराप्रमाणे विद्युत पुरवठा व्हावा,यासाठी अनेक आंदोलने केली,अनेक वेळा निवेदने दिली,परंतू कसलीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे,या भागातील नागरिकांना नेहमीच अंधाराचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी, या भागात शहराप्रमाणे सिंगल फेजचे नवीन ट्रान्सफार्मर बसवून विद्युत पुरवठा करावा,या मागणीसाठी बुधवार दि. २४ मे रोजी सकाळी १० वा. मिरज- पंढरपूर हायवेवर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर नागरिकांसह रास्ता रोको आंदोलन करणार आहे,अशा आशयाचे निवेदन माजी नगरसेवक सतिश सावंत यांनी जिल्हाधिकारी सोलापूर,आम.अ‍ॅड.शहाजीबापू पाटील,माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील,महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी कार्यालयाचे कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता,सहाय्यक अभियंता,तहसिलदार, पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button