पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते गायक मोहंम्मद अयाज यांचा सन्मान
सोलापूर :
मातृ दिनानिमित्त नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या एका सांस्कृतिक कार्यक्रमात सिनेसृष्टी मधील सुप्रसिध्द गायिका तथा पद्मश्री अनुराधा पौडवाल व त्यांच्या सुकन्या असलेल्या नवोदित गायिका कविता पौडवाल यांच्या शुभहस्ते सोलापूरचे सुप्रसिध्द गायक मोहंम्मद अयाज यांचा नुकताच सन्मान करण्यात आला.
या सांस्कृतिक कार्यक्रमात “ऐ माँ तू कितनी अच्छी है,निसर्ग राजा ऐक सांगते,इक प्यार का नगमा है,दर्दे दिल,शोधीशी मानवा,काळया मातीत तिफन चालते,अश्विनी येssना,नजर के सामने,तम्मा तम्मा लोगे” ही सर्व अजरामर ठरलेली अनेक गाणी सादर करुन नागपूर रसिकांनी “अनुराधा पौडवाल-कविता पौडवाल-मोहंम्मद अयाज असा त्रिवेणी सूर संगम अनुभवला.
सिनेसृष्टीतील सुप्रसिध्द गायिका अनुराधा पौडवाल यांनी महागायक स्पर्धेत खूप मोलाची साथ दिली होती आणि म्हणूनच मी “महागायक” म्हणून विजेतेपद पटकावू शकलो. तसेच माझ्या या यशामध्ये माझ्या सोलापूरकरांचा देखील मोठे योगदान आहे.आणखी खूप कांही करायचे आहे.मी एक छोटासा कलांवत आहे, पण अनुराधा दिदी या आपल्या प्रत्येक कार्यक्रमात मला संधी देऊन माझ्यावर कृपादृष्टी दाखवत असतात, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट असून मला त्याचा अत्यंत आंनद होतो आणि अभिमान वाटतो, अशी भावना मोहम्मद अयाज यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
—————————————————————————