आरोग्य

महिला दिनानिमीत्त स्पंदन हॉस्पिटलकडून गुरुवारी आशा वर्कर्स सन्मान सोहळा

 

सांगोला :

महिला दिनाचे औचित्य साधून सांगोला शहरातील स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने आशा वर्कर्स यांच्या सन्मान सोहळ्याचे आज गुरुवारी ९ मार्च रोजी सकाळी ११ वा. आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्पंदन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या वतीने देण्यात आली आहे.

२१ व्या शतकात स्त्रियांचे क्षेत्र हे फक्त चूल आणि मूल, यापुरतेच मर्यादित न राहता सर्वच क्षेत्रात अथांग बनलेले आहे. स्त्रियांचा प्रवेश नसलेले क्षेत्र आता उरलेलं नाही. राजकारण,समाजकारण,विज्ञान,शिक्षण,आरोग्य,शेती, पर्यावरण इ.अनेक क्षेत्रात तिने उत्तुंग भरारी घेतली.पण, उंचच-उंच झेपावताना स्वतःच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा कधीही विसर पडू दिलेला नाही. आपली व्यावसायिक जबाबदारी पार पाडत असताना, कौटुंबिक जबाबदारीकडे तिने कधीही दुर्लक्ष केले नाही.नोकरी व घर सांभाळताना तारेवरची कसरत सहजपणे पार पाडणार्‍या या स्त्रीशक्तीचा सन्मान म्हणून स्पंदन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या वतीने सांगोला तालुक्यातील आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या आशा वर्कर्स यांचा गुरुवारी सन्मान आयोजित करण्यात आला आहे.

सांगोला पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक सोनम जगताप, ॲथलेटिक्स तथा वनविभागाच्या नियत क्षेत्र अधिकारी वनिता इंगोले यांच्या शुभहस्ते तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सीमा दोडमणी यांचे अध्यक्षतेखाली तर,स्त्रीरोग तज्ञ डॉ.नेहा पाटील, बालरोग तज्ञ डॉ.संगीता पिसे आणि डॉ.मेघना देवकते यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,सांगोला येथे गुरुवारी सकाळी ११ वा.हा सन्मान सोहळा पार पडणार आहे.तरी, या सन्मान सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button