सांगोला :
जागतिक महिला दिनानिमित्त पालावर राहणाऱ्या महिलांना गुलाब पुष्प व भेटवस्तू देऊन आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने बुधवारी महिला दिन साजरा करण्यात आला.
रोजी रोटीसाठी भटकंती करत गांवोगांवी फिरत काबाड कष्ट करणाऱ्या कुटुंबातील महिलांना त्यांच्या राहत्या पालावर जाऊन गुलाब पुष्प व पाण्यासाठी स्टील कळशी सांगोला येथील आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने भेटवस्तू देऊन जागतिक महिला दिनानिमित्त एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येवून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
ज्यांना जागतिक महिला दिन म्हणजे काय ? हेही माहित नाही, अशा महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल त्या महिलांनाही मोठा आनंद झाला व त्यांनी आभार व्यक्त केले.यावेळी आपुलकीचे अध्यक्ष राजेंद्र यादव,सचिव संतोष महिमकर,प्रमोदकाका दौंडे,महादेव दिवटे,दादा खडतरे इ.उपस्थित होते.
—————————————————————————
More Stories
सांगोला राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत १० कि.मी.खुल्या गटात युपीचा मनुकुमार प्रथम
सांगोला नगरपालिकेकडून मिरज रोड बायपास ते वंदे मातरम चौक बायपास मार्गावर डेकोरेटिव्ह लाईट उभारणी
आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या विशेष प्रयत्नांतून दिघंची जिल्हा हद्द ते वाणीचिंचाळे-भोसे रस्त्यासाठी ३४२ कोटी मंजूर