सांगोला विधानसभा क्षेत्रातील अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण भागाच्या विकासासाठी ७५ लाख निधी मंजूर – आमदार शहाजीबापू पाटील
सांगोला :
राज्यातील अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्र विकास योजने अंतर्गत सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात सांगोला विधानसभा क्षेत्रातील अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण भागाच्या विकासासाठी व मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सांगोला विधानसभा क्षेत्रातील ९ गांवांसाठी १० कामांना एकूण ७५ लाख रुपये निधी वितरित करण्यात आला असल्याची माहिती सांगोल्याचे विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील दिली.
मंजूर झालेली कामे पुढीलप्रमाणे :
१) चिकमहुद (ता.सांगोला) मुस्लीम मस्जीद समोर पेव्हिंग ब्लॉक बसविणे व संरक्षण भिंत बांधणे – रु.१० लक्ष,
(२) अचकदाणी (ता.सांगोला) येथील मुस्लीम मस्जीदसाठी संरक्षण भिंत बांधणे – रु.५ लक्ष, (३) बलवडी (ता.सांगोला) येथील मस्जीदसमोर पेव्हिंग ब्लॉक बसविणे – रु.५ लक्ष,
(४) शेळवे (ता.पंढरपूर) येथील मुस्लिम दफनभूमी येथे पेव्हिंग ब्लॉक बसविणे – रु.५ लक्ष, (५) भाळवणी (ता.पंढरपूर) येथील ईदगाह दफन भूमीसाठी संरक्षण भिंत बांधणे – रु. ५ लक्ष, (६) जैनवाडी (ता.पंढरपूर) येथे जैन समाजासाठी समाज मंदिर बांधणे – रु.५ लक्ष, (७) नाझरे (ता. सांगोला) येथील इदगाह मैदान, आटपाडी रोडलगत पेव्हिंग ब्लॉक बसविणे – रु.५ लक्ष, (८) मांजरी (ता.सांगोला) येथील लाडले मशाक बाबा दर्गाह येथे पेविंग ब्लॉक बसविणे – रु.५ लक्ष, (९) अकोला (ता.सांगोला) येथील मुस्लिम मस्जीद समोर पेव्हिंग ब्लाॅक बसविणे – रु.५ लक्ष, (१०) मांजरी (ता.सांगोला) येथील लाडले मशाक दर्ग्याजवळ ग्रामपंचायत जागेत यात्री निवास बांधणे – रु.२५ लक्ष.
वरीलप्रमाणे,सांगोला विधानसभा मतदारसंघातील ९ गावांसाठी १० कामांना एकूण ७५ लाख रुपये निधी महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागाकडून मिळाल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
—————————————————————————