सांगोला :
ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी बेस्ट फिजिक मेन चॅम्पियनशिप २०२२-२३ या स्पर्धेत सांगोला तालुक्यातील डोंगरगावचा बॉडीबिल्डर संकेत संजय काळे याने बुधवारी रौप्य पदक जिंकले आणि नॅशनल चॅम्पियनशिप मिळवून उज्वल यश संपादन केले.
येनेपोया डिम्ड.टू.बी.युनिव्हर्सिटी मेंगलोर (कर्नाटक) येथे बुधवारी २२ फेब्रूवारी रोजी पार पडलेल्या या स्पर्धेत देशातील सर्व युनिव्हर्सिटीचे बॉडीबिल्डर सहभागी झाले होते. त्यात सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी, पुणे कडून नेतृत्व करत या स्पर्धेत सहभाग नोंदवून संकेतने तिसरा नंबर मिळवून शालेय नॅशनल चॅम्पियनशिप वर आपले नांव सुवर्ण अक्षराने नोंदवले.
यापूर्वीही इंडियन बॉडी बिल्डर अँड फिटनेस फेडरेशनने आयोजित केलेल्या इंटरनॅशनल बॉडी बिल्डिंग स्पर्धेतही जुनियर “भारतश्री” होण्याचा मान बॉडी बिल्डर संकेत संजय काळे यांने मिळवला आहे. या स्पर्धां व्यतिरिक्त विद्यापीठ स्तर, राज्य स्तर व राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन २५ पेक्षा अधिक पदकांची कमाई केली आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी संकेत हा रोल मॉडेल ठरला आहे.या यशाबद्दल संकेत काळेचे क्रीडाप्रेमी, नेतेमंडळी,सामाजिक कार्यकर्ते व पालक वर्गातून तसेच सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
—————————————————————————
More Stories
मुलींनी परदेशात जाऊन उच्चशिक्षित व्हावे – डॉ.शिवानी महेश आसबे
अजनाळे येथील अभिनव पब्लिक स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न
माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानतर्फे किशोरी साठी ‘प्रेम,मैत्री व आकर्षण’ कार्यक्रम संपन्न