सांगोला नगरपरिषदेमार्फत पर्यावरणपूरक पद्धतीने शिवजयंती साजरी

 

सांगोला :

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९३ व्या जयंतीचे औचित्य साधून शहरात विविध ठिकाणी ३९३ देशी वृक्षांची लागवड करून सांगोला नगरपरिषदेमार्फत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

पर्यावरण संवर्धनासाठी राज्यभर सुरु असलेल्या “माझी वसुंधरा” अभियानाची सांगोला नगरपरिषदे मार्फत प्रभावी अंमलबजावणी सुरु असून याचाच एक भाग म्हणून सांगोला शहरास पर्यावरण पूरक हरित शहर बनवण्याच्या दृष्टीने नगरपरिषदे मार्फत शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली जात असून त्याची जोपासना ही केली जात आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ३९३ वी जयंती १९ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. महाराजांची ही ३९३ वी जयंती असल्याने यानिमित्ताने ३९३ वेगवेगळी देशी प्रजातीची झाडे लावण्यात येऊन ही जयंती पर्यावरण पूरक पद्धतीने साजरी केली गेली. यावेळी, तहसीलदार तथा प्रशासक अभिजीत पाटील तसेच मुख्याधिकारी डाॅ.सुधीर गवळी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

३९३ वृक्ष लागवडीची ठिकाणे :

(१) साठे नगर – (तहसील कार्यालयाच्या मागे,पंढरपूर रोड – ८० वृक्ष) – (२) घनकचरा डेपो – (कडलास रोड – १९३ वृक्ष)(३) शासकीय धान्य गोडाऊन परिसर – (८० वृक्ष)            (४) माळवाडी रोड – (४० वृक्ष)

सदर वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा अभियंता तुकाराम माने यांचेसह नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाची टीम यांनी विशेष मेहनत घेतली. ही वृक्ष लागवड मोहीम तहसीलदार तथा प्रशासक अभिजीत पाटील, मुख्याधिकारी सुधीर गवळी, पाणीपुरवठा अभियंता तुकाराम माने, कार्यालयीन अधीक्षक विजयकुमार कन्हेरे, सहाय्यक मालमत्ता पर्यवेक्षक स्वप्निल हाके, सीएलटीसी स्थापत्य अभियंता अमित कोरे, स्वच्छता निरीक्षक विनोद सर्वगोड, सहाय्यक प्रकल्प अधिकारी योगेश गंगाधरे तसेच कार्यालयीन कर्मचारी व पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडली.                                         —————————————————————————

सांगोला शहरात वृक्ष लागवड व संवर्धनाबाबत जनजागृतीसाठी प्रयत्न :

               सांगोला शहरात वृक्ष लागवड व संवर्धन याबाबत जनजागृती होऊन पर्यावरण पूरक शहराकडे वाटचाल व्हावी,या उद्देशाने १६ व्या शतकात वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या राजांची ३९३ वी जयंती ३९३ वृक्षांची लागवड करून साजरी करण्याचा हा छोटासा प्रयत्न केला आहे.
                               –  मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी