लेझीम पथकासह महिलांची रॅली काढून सांगोल्यात छ.शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवास प्रारंभ

 

सांगोला :

                    क्रांतीसुर्य जोतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन सुरुवात करण्यात आलेली रॅली छ.शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर महाराजांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात आली. मुलींनी परिधान केलेल्या विविध वेशभुषा व लेझिम पथकाच्या आकर्षक खेळाद्वारे सांगोला शहरातून महिलांची भव्य रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९३ व्या जयंतीस शनिवारी प्रारंभ करण्यात आला.

सांगोला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मंडळाच्या वतीने छ.शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवास महिलांच्या रॅलीने शनिवारी मोठ्या दिमाखात सुरुवात करण्यात आली. रॅलीदरम्यान, तरुणींनी विविध वेशभूषा धारण केलेल्या होत्या. तर, घोड्यावर स्वार महाराजांची प्रतिकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.यावेळी सांगोला शहर व तालुक्यातील असंख्य महिला या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या

रविवारी १९ फेब्रुवारी रोजी सकाळी सांगोला शहरातील छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक तसेच विवीध मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार व शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार असून दुपारी २ वाजता मल्लखांब तसेच दि. 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता कोल्हापूर येथील मराठमोळ्या व देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. दि.२१ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रक्तदान शिबीर तर दुपारी ३ वाजेपर्यंत कुल्लोळी इन्स्टिट्युट ऑफ हेल्थ केअर संचलित, कुल्लोळी व नेत्ररोग निदान,सांगली यांच्या सहकार्याने मोफत नेत्र व मोतीबिंदू तपासणी होणार असल्याचे जयंती उत्सव मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे. तर,शनिवारी निघालेल्या महिलांच्या रॅलीमध्ये बँड, घोड्यावर स्वार बालशिवाजी, जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या सह अनेक महिला महापुरुषांच्या वेशातील महिलांनी लक्ष वेधून घेतले होते. विशेष बाब ही की, या रॅलीमध्ये तालुक्यातील सर्वधर्मीय महिलांनी उस्फुर्त सहभाग घेतला होता.                                                   —————————————————————————

मुली व वयोवृद्ध महिलांचा उत्स्फूर्त सहभाग :

                  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जयंतीनिमित्त शिवप्रेमी मंडळाच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक यादरम्यान महिला रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीमध्ये पारंपरिक वेशभूषा परिधान करुन मुली व महिलांनी लेझीम,दांडपट्टा आदी उपक्रम सादर केले. सदर रॅलीमध्ये २ वर्षाच्या बालकां पासून ते मुली व वयोवृद्ध महिलांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदविला. याप्रसंगी,शिवछत्रपतींच्या जीवन चरित्रावरील गीतावर उपस्थित मुली, महिलांनी आपली कलाकृती सादर केली.  —————————————————————————