सांगोला :
महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील पहिले आय.एस.ओ. मानांकन असलेल्या आनंद हॉस्पिटल मॅटर्निटी, ॲक्सीडेंट, ट्रॉमा सेंटर व २४ तास अत्यावश्यक सेवा सुविधा पुरविणारे हॉस्पिटल म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या आनंद हॉस्पिटल येथे उद्या रविवारी १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गरोदर मातांची मोफत तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले असून सदर गरोदर मातांची मोफत तपासणी व उपचार शिबिराचे उदघाटन आमदार शहाजीबापू पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील व पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते सकाळी १० वाजता संपन्न होणार आहे.
सदर शिबिराची वैशिष्ट्ये :
गरोदर मातांची मोफत तपासणी व उपचार,मोफत सोनोग्राफी,मोफत रक्त तपासणी तसेच ५ हजार रुपयांत नॉर्मल डिलिव्हरी करण्यात येणार आहे. यामध्ये हॉस्पिटल,मेडिकल, भूल खर्च समाविष्ट असणार आहे. शिबिरामध्ये नोंद केलेल्या पेशंटला पुढील उपचारासाठी,शस्त्रक्रियेसाठी सवलत देण्यात येणार आहे. तसेच वेदना विरहित बाळंतपणाची सोय व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
तरी, सांगोला शहर व तालुक्यातील गरोदर महिलांनी सदर शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा,असे आवाहन जनरल सर्जन व अस्थिरोगतज्ञ डॉ.अमर शेंडे, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र डॉ.परेश खंडागळे तसेच डॉ.स्वाती खंडागळे यांनी केले आहे. —————————————————————————
More Stories
स्व.डॉ.गणपतराव देशमुख यांच्या पुण्यस्मरण व जयंतीनिमीत्त महाआरोग्य तपासणी शिबीर व महा रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमीत्त खंडागळे मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये मंगळवारी मोफत तपासणी,शस्त्रक्रिया व रक्तदान शिबीर
खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत मुत्ररोग निदान व मोफत शस्त्रक्रिया उपचार शिबीर