BREAKING NEWS : अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षालाच मिळाले “शिवसेना” नांव आणि “धनुष्यबाण” चिन्ह

 

मुंबई :

अखेर निवडणूक आयोगाने आज उध्दव ठाकरेंना मोठा दणका देत “शिवसेना” हे पक्षाचं नांव आणि “धनुष्यबाण” हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच दिल्याचे जाहीर केल्याने निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मोठा दिलासा दिला तर, उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना घेऊन शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेवून त्यानंतर शिवसेना पक्षावर तसेच चिन्हावरही दावा केला होता आणि निवडणूक आयोगासमोर याची लढाई सुरु होती.निवडणूक आयोगाने आजचा हा निर्णय देताना शिवसेनेच्या घटनेवरही मत व्यक्त केले असून शिवसेनेची घटना ही लोकशाहीला धरुन नसल्याचे निवडणूक आयोगाने म्हंटले आहे. यासंबंधी निवडणूक आयोगाने म्हंटले आहे की,लोकशाही पायदळी तुडवून कोणत्याही निवडणुकीशिवाय शिवसेनेने पक्षात पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तसेच शिवसेना पक्षाच्या घटनेत २०१८ मध्ये सुधारणा करण्यात आल्या असता, त्याबाबत निवडणूक आयोगाला माहितीही देण्यात आली नसल्याचे सांगीतले. अखेर आज निवडणूक आयोगाने याबाबतचा निर्णय दिला असून “शिवसेना” हे नांंव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला दिले एवढेच नव्हेतर, पूर्वीचे पक्षाचे चिन्ह “धनुष्यबाण” हे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच दिल्याने राज्यात एकच खळबळ उडाली असून आता ठाकरे कुटुंबाकडून शिवसेना निसटल्याने उध्दव ठाकरे समर्थकांना चांगलाच धक्का बसला आहे.

शिंदे आणि ठाकरे गट हे सर्वोच्च न्यायालयात एकमेकांविरुध्द उभे ठाकलेले असताना आणि आजच सुप्रीम कोर्टाने “७ न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यास नकार देवून” उध्दव ठाकरे गटाला मोठा धक्का दिलेला असताना दुसरीकडे,आजच निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंच्या पारड्यात पक्षासह पक्षचिन्ह “धनुष्यबाण” ही सुपूर्द करण्याचा निर्णय घेतल्याने,पुढच्या दोन ते तीन महिन्यांत होणार्‍या राज्यातील महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जाहीर होण्यापूर्वीच शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानं एकीकडे उध्दव ठाकरे गटाचे खच्चीकरण तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.
—————————————————————————