सांगोला विज्ञान महाविद्यालया अंतर्गत स्पर्धा परीक्षा समिती मार्फत “सेट परीक्षेची तयारी” या विषयावर मार्गदर्शन

 

सांगोला :

             सांगोला येथील विज्ञान महाविद्यालया अंतर्गत स्पर्धा परीक्षा समितीमार्फत पदव्युत्तर विभागातील विद्यार्थ्यांना “महाविद्यालयीन काळात सेट परीक्षेची तयारी कशी करावी ?” या विषयावर इंग्रजी विषयाचे सहा.प्राध्या.शिंदे डी.आर.यांनी गुरुवारी १६ फेब्रूवारी रोजी मार्गदर्शन केले. पदव्युत्तर विभागातील जे विद्यार्थी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून करिअर करु इच्छितात,अशा विद्यार्थ्यांना सेट परीक्षेबद्दल माहिती व्हावी,ह्या हेतूने सदर कार्यकर्माचे आयोजन करण्यात आले होते.सदर मार्गदर्शन वर्गामध्ये प्रा.शिंदे डी.आर.यांनी महाविद्यालयामध्ये शिकत असतानाच सेट पेपर भाग एक या विषयाची तयारी करताना ऍप्टीट्यूड टेस्ट,लॉजिकल रीजनिंग,नंबर सेरीज,लेटर अनालॉजी,नफा-तोटा,सरासरी, वेळ व घड्याळ इ.संबंधित प्रश्न विविध उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.

प्रारंभी,समिती चेअरमन प्रा.शेख जे.यु.यांनी कार्यक्रमाचे पाहुणे प्रा.शिंदे डी.आर.यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.शेख एन.एस. यांनी केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी प्रा.रसाळ एन.एस.,प्रा.चव्हाण सी.डी.,प्रा.बंडगर एन.एच., प्रा.भानवसे डी.पी.व इतर सहकारी प्राध्यापक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.सदर कार्यक्रमास पदव्युत्तर विभागातील बहुसंख्य विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.
—————————————————————————