सांगोला :
सांगोला शहरात नव्यानेच सुरु करण्यात आलेल्या युवांश क्लिनिकचे डॉ.यशोदीप गायकवाड व डॉ.पूजा गायकवाड या डॉक्टर दांपत्याच्या वतीने व अजनाळे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१८ जानेवारी रोजी सांगोला तालुक्यातील अजनाळे येथे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या मोफत आरोग्य शिबिराचे उदघाटन सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक विजयदादा येलपले, अजनाळे गांवच्या सरपंच सौ.सुजाता देशमुख व उपसरपंच अर्जुन येलपले यांच्या उपस्थितीत पार पडले.
सदर आरोग्य शिबिरामध्ये डॉ.यशोदीप गायकवाड व डॉ.पूजा गायकवाड यांनी अजनाळे गांवातील सुमारे २३३ रुग्णांना तपासून त्यांना औषधोपचार व योग्य तो वैद्यकीय सल्ला दिला.या शिबिरामध्ये रक्तदाब, मधुमेह व इतर आजार याविषयीच्या गरजेनुसार तपासण्या करून त्यांना मोफत औषधे देण्यात आली.डॉ.पूजा गायकवाड यांनी महिला रुग्णांना तपासून त्यांना आवश्यक औषधे तसेच वैद्यकीय सल्ला दिला.युवांश क्लिनिकचे डॉ.यशोदीप गायकवाड व डॉ.पूजा गायकवाड यांनी सामाजिक बांधिलकी जपत अजनाळे गांवामध्ये या शिबिराचे आयोजन करून ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना या मोफत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा दिली.
मोफत आरोग्य शिबीर आयोजित केल्याबद्दल अजनाळे ग्रामस्थांनी डॉक्टर दांपत्याचे आभार मानले. डॉ.यशोदीप गायकवाड व डॉ.पूजा गायकवाड यांनी यावेळी बोलताना, ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेसाठी यापुढेही गांवोगांवी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येणार आहेत,अशी माहिती दिली.
हे आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी आरोग्य सेवक अशोक कुलाल,महादेव बंडगे,अतुल येलपले, संजय येलपले,चंद्रकांत पवार तसेच आशा वर्कर ज्योती येलपले,रंजना येलपले,पल्लवी धांडोरे,सारिका आवटे यांचे सहकार्य लाभले.
—————————————————————————
More Stories
स्व.डॉ.गणपतराव देशमुख यांच्या पुण्यस्मरण व जयंतीनिमीत्त महाआरोग्य तपासणी शिबीर व महा रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमीत्त खंडागळे मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये मंगळवारी मोफत तपासणी,शस्त्रक्रिया व रक्तदान शिबीर
खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत मुत्ररोग निदान व मोफत शस्त्रक्रिया उपचार शिबीर