सांगोला :
स्त्री ही जन्मापासून मरेपर्यंत सदैव सुवासिनीच असते, पतीचा मृत्यू ही नैसर्गिक घटना आहे,त्यात त्या स्त्रीचा कांहीही दोष नसतो. महिलांनी महिलांना समजावून घेतलं तर,घराचे नंदनवन होईल. महिलांनी महिलांना मानसन्मान दिला पाहिजे,अनिष्ट रुढी व परंपरा नष्ट केल्या पाहिजेत.संक्रात हा सण विधवा महिलांच्या सन्मानाचा सण झाला पाहिजे.महिलांनी जात व धर्म यांची चिकित्सा केली पाहिजे. सत्यशोधक होऊन सत्याचा शोध घेतला पाहिजे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय संविधानातील हिंदू कोड बिल समजावून घेतले पाहिजे. महिलांनी घराचे घरपण जपले पाहिजे, व्यसनमुक्तीची चळवळ महिलांनी हाती घेतली पाहिजे. माँसाहेब जिजाऊ राजमाता, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सतीची प्रथा मोडीत काढली.त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आता महिलांनी ही विधवा प्रथा मोडीत काढली पाहिजे,असे मत कवी आबासाहेब शेजाळ यांनी सोनंद येथे व्यक्त केले.
प्रथम एज्युकेशन फाउंडेशनने सोनंद (ता.सांगोला) येथील आम्रपाली बुद्ध विहार येथे नुकताच विधवा महिला सन्मान सोहळा आयोजित केला होता,यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कवी आबासाहेब शेजाळ बोलत होते.याप्रसंगी,प्रमुख पाहुणे शेजाळ यांनी “सावित्रीच्या लेखी माझे देव” व “स्त्री सदैव सुवासिनी असते”,या कविता सादर करुन महिलांना भावनिक केले.प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे तालुका प्रतिनिधी बापूसाहेब ठोकळे यांनी “गोल फोर गर्ल्स व स्टूल एक्झिबिशन ” या उपक्रमाची माहिती दिली. गोल्फ फॉर गर्ल्स या कृतीचे सरस्वती राजेंद्र काटे यांच्या हस्ते उदघाटन करून त्यांना सुवासिनीचा मान दिला.सर्व महिलांनी सरस्वती ताईंना हळदीकुंकू लावून तिळगुळ देऊन सन्मान केला.यावेळी त्यांनी राजेंद्र काटे सरांच्या अनेक आठवणी जाग्या केल्या. या कार्यक्रमाला राजेंद्र काटे सरांच्या मातोश्री यांचेसह बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.अनुप ठोकळे व ठोकळे गुरुजी यांनी कार्यक्रमाला सहकार्य केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापूसाहेब ठोकळे यांनी केले तर, आभार अनिल जगधने सर यांनी मानले.
प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या भव्य महिला मेळाव्यात विधवा महिलांनी घेतला सुवासिनीचा मान :
प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे बापूसाहेब ठोकळे यांच्या पुढाकाराने स्वानंद मध्ये पारंपारिक पद्धतीला फाटा देऊन परिवर्तन प्रथमच्या गोल फॉर गर्ल्स ऍक्टिव्हिटीचे उदघाटन मयत राजेंद्र काटे यांच्या पत्नी सरस्वती राजेंद्र काटे यांना सुवासिनीचा मान देऊन त्यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.यावेळी परिवर्तनाचे अतिशय उत्कृष्ट कार्य करणारे सामाजिक प्रबोधन करून अनेकांचे परिवर्तन करणारे आबासाहेब शेजाळ गुरुजी यांनी सुंदर मार्गदर्शन केले. यावेळी नेताजी ठोकळे गुरुजी,अनुप ठोकळे सर, किरण ठोकळे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
—————————————————————————
More Stories
जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोले नगरपरिषदेचा दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक,पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजा माने