सांगोला :
आपुलकी प्रतिष्ठानच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त नव वर्षाच्या पूर्व संध्येला शनिवार दि.३१ डिसेंबर रोजी भारुड जुगलबंदी, पुरस्कार वितरण व “दारु नको, दूध प्या” अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर श्रीमती लक्ष्मी सुभाष लठ्ठे,शाम सोपान पवार,विनोद सुरेश बेले, चंद्रकांत दामोदर पाटील व इनरव्हील क्लब, सांगोला यांना आपुलकीच्या पहिल्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष राजेंद्र यादव यांनी दिली.
आपुलकी प्रतिष्ठानच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त छ. शिवाजी महाराज चौक, सांगोला येथे सायंकाळी ६ वाजता भारुडाची जुगलबंदी हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. त्याचबरोबर श्रीमती लक्ष्मी सुभाष लठ्ठे यांना कृतिशील आदर्श माता पुरस्कार,शाम सोपान पवार यांना समाजसेवा प्रेरणा पुरस्कार,विनोद सुरेश बेले यांना सृजनशील शेतकरी पुरस्कार,चंद्रकांत दामोदर पाटील यांना सार्थ स्वाभिमान पुरस्कार तर इनरव्हील क्लब,सांगोला यांना आदर्श संस्था पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तर ३१ डिसेंबर निमित्त कार्यक्रमाचा समारोप व नवीन वर्षाचे स्वागत “ दारु नको, दूध प्या” या उपक्रमाने होणार आहे. तरी, या कार्यक्रमासाठी सांगोला शहर व परिसरातील नागरिकांनी उपस्थित रहावे,असे आवाहन अध्यक्ष राजेंद्र यादव व सचिव संतोष महिमकर यांनी केले आहे.
More Stories
सांगोल्यात ओम आनंदा माने यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा
सांगोला महिला शहर राष्ट्रवादीच्या घरगुती गौरी सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न
आम.शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त कोळा येथे मोठ्या जल्लोषात पार पडला बैलगाडी शर्यतीचा थरार