आरोग्य

चाकूने वार झाल्याने फाटलेल्या आतड्यांची सांगोल्यात यशस्वी शस्त्रक्रिया : रुग्णाला मिळाले जीवदान

 

सांगोला :

चाकूने वार करण्यात आल्यामुळे पोटामधील लहान आतडे व मोठ्या आतड्यावर ८ ठिकाणी फाटून पोटात रक्त साठलेल्या अत्यवस्थ अवस्थेत आलेल्या रुग्णावर सांगोला येथील वेदांत मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटल मध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याने त्याला जीवदान मिळाले असून वेदांत मल्टीस्पेशालिटीच्या डाॅक्टर्सचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सांगोला तालुक्यातील झापाची वाडी येथील संजय आलदर यांचेवर तीन ते चार ठिकाणी चाकूने वार करण्यात आले होते.त्यामुळे पोटामधील लहान आतडे व मोठ्या आतड्यावर सुमारे ८ ठिकाणी फाटले होते व पोटामध्ये रक्त साठले होते,अशा अवस्थेत सदर जखमी रुग्ण हा सांगोला येथील वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये अत्यंत क्रिटिकल कंडीशनमध्ये आला असता,सुप्रसिध्द अस्थिरोग तज्ञ डॉ.अमर शेंडे यांनी रुग्णाची अवस्था पाहून वेदांत हॉस्पिटलमधील इतर सर्व डॉक्टरांसह सल्लामसलत करुन तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि अत्यंत कठीण अशी ही शस्त्रक्रिया करण्यासाठी सुमारे ४ ते ५ तास लागले.वेळीच निर्णय घेवून तात्काळ शस्त्रक्रिया केल्याने अत्यवस्थ अवस्थेत आलेला सदर रुग्ण आज चांगला ठणठणीत होवून बरा झाल्याने या रुग्णाला पुनर्जन्म मिळाल्याचा आनंद रुग्णासह त्याच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.

या शस्त्रक्रियेसाठी डॉ.अमर शेंडे, डॉ.महावीर आलदर, डॉ.सुरेश वरशेट्टी,डॉ.आण्णासो लवटे,डॉ.निरंजन केदार, डॉ.परेश खंडागळे,डॉ.प्रसाद साळे,डॉ.रवींद्र नाईकवाडी,डॉ.बसवेश्वर पाटील,डॉ.संतोष पाटील, डॉ.विनायक डमकले,डॉ.प्रमोद बोराडे,डॉ.अक्षय मरगळे,डॉ.स्वाती खंडागळे,भारत गरांडे,कांबळे सिस्टर,तब्बू सिस्टर,फयाज ब्रदर व वेदांत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा संपूर्ण स्टाफ या सर्वांचे सहकार्य लाभले.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button