कडलास येथे १ जानेवारीला मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन 

कडलास (ता.सांगोला) :

               नूतन वर्षाचे स्वागत आरोग्यदायी चळवळीने करण्यासाठी कडलास गावचे सुपुत्र व सांगली येथील जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन पवार यांचे संकल्पनेतून १ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ६ वाजता कडलास (ता.सांगोला) येथील बहुउद्देशीय प्रशालेच्या मैदानावर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत खुल्या गटासाठी दहा किलोमीटर व पाच किलोमीटरच्या पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून प्रथम क्रमांकासाठी ३ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी २ हजार रुपये व तृतीय क्रमांकासाठी १ हजार रुपये तसेच ट्रॉफी अशी पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र बक्षीसे असतील .त्याचबरोबर,शालेय विद्यार्थ्यांसाठी इयत्ता आठवी ते दहावी गटासाठी ३ किलो मीटर धावणे व इयत्ता पाचवी ते सातवी गटासाठी २ किलो मीटर धावणे,अशी स्पर्धा आहे.त्यासाठी प्रथम क्रमांकासाठी १ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ७००/- रु.व तृतीय क्रमांकासाठी ५००/- रु.अशी मुला-मुलींसाठी स्वतंत्र बक्षिसे देण्यात येतील.

स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून युवकांनी व्यसनाधीनता टाळून आरोग्य चळवळीकडे वळावे हा यामागे उद्देश आहे. स्पर्धेसाठी नोंदणी शुल्क कांहीही नाही. तरी,सदर स्पर्धेत जास्तीत जास्त युवकांनी व शालेय विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

—————————————————————————