मनोरंजन

पक्षी प्रेमींनी केले फॉरेस्टमध्ये ट्रेकिंग तर, बुद्धेहाळ तलाव परिसरात केले पक्षी निरीक्षण

 

सांगोला :

पक्षीप्रेमींनी शुकाचार्य डोंगर ते डोंगर पाचेगांव फॉरेस्ट येथे ट्रेकिंग करत बुद्धेहाळ तलाव परिसरात पक्षी निरीक्षण करुन आनंद लुटला. सांगोला वन परीक्षेत्र कार्यालय,पक्षी प्रेमी ग्रुप व आपुलकी प्रतिष्ठान यांच्यावतीने हे पक्षी निरिक्षण व ट्रेकिंग आयोजित करण्यात आले होते.

वन्यजीव अभ्यासक अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिन ५ नोव्हेंबर आणि थोर पक्षीतज्ञ तसेच पद्मभूषण डॉ.सलीम अली यांची जयंती १२ नोव्हेंबर दरम्यान राज्यात पक्षी सप्ताह साजरा करण्यात येतो.याच अनुषंगाने सांगोला येथील पक्षीप्रेमी ग्रुप,वन परीक्षेत्र सांगोला व आपुलकी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पक्षी निरीक्षण व ट्रेकिंगचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ६ वाजता सांगोला येथून निघून पक्षी मित्रांनी प्रथम शुकाचार्य येथे जाऊन शुक्राचार्यचे दर्शन घेतले. त्यानंतर शुकाचार्य डोंगरापासून दऱ्या उतरत डोंगर पाचेगांव गाठले. पावसाळ्यानंतरच्या हिरव्यागार निसर्गाचा आणि आल्हाददायक वातावरणाचा आनंद पक्षी प्रेमीनी ट्रेकिंग करताना लुटला. त्यानंतर बुद्धेहाळ येथील तलाव परिसरात भटकंती करत विविध प्रकारच्या देशी व परदेशी पक्षांचे निरीक्षण केले. त्यानंतर, वनभोजनाने या उपक्रमाची सांगता झाली.

या उपक्रमात वनपाल एस.एल.मुंढे,वनरक्षक बी.पी. इंगोले, वनरक्षक जी.बी.व्हरकटे,वनपाल एस.ए.घावटे,वनपाल एस.एल.वाघमोडे, वनरक्षक ए.के.कारंडे, आर.बी.कवठाळे यांच्यासह वन मजूर तसेच राजेंद्र यादव, दीपक चोथे, प्रा. विधीन कांबळे,प्रा.एस.के.पाटील, बाळासो नकाते,छाया यादव,सुजाता पाटील,तेजश्री कांबळे,शोभनतारा मेटकरी यांच्यासह पक्षी प्रेमी ग्रुपचे सदस्य व आपुलकी प्रतिष्ठानचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

               ट्रेकिंग करणार्‍या जेष्ठांचे अभिनंदन :

ट्रेकिंग आणि पक्षी निरीक्षणाच्या या उपक्रमात ७३ वर्ष वय असलेल्या हरिभाऊ जगताप गुरुजी आणि प्रकाश महाजन या दोन जेष्ठ नागरिकांनी सहभाग घेऊन या वयातही ट्रेकिंग करुन ते यशस्वी करत आनंद लुटल्याबद्दल त्यांचे वन खात्याने यावेळी विशेष अभिनंदन केले.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button