शैक्षणिक

इंजीनियरिंग प्रथम वर्ष डिप्लोमाच्या  प्रवेश प्रक्रियेस ३० जूनपर्यंत मुदतवाढ

 

सांगोला :

                         दहावीनंतरच्या प्रथम वर्ष डिप्लोमा इन इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेस महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ,मुंबईयांचेकडून दि.३० जून २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती सांगोला येथील शिवाजी पाॅलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य डाॅ.आर.ए.देशमुख यांनी दिली असून
शिवाजी पाॅलिटेक्निकमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांची सध्या चांगलीच लगबग चाललेली दिसून येत आहे.

प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविकेची प्रवेश प्रक्रिया दि.१जून २०२३ पासून सुरू असून सुमारे १ लाख १५ हजार  विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरले आहेत. परंतु अनेक विद्यार्थ्यांना आपल्या प्रवर्गासाठी आवश्यक असणारी  कागदपत्रे उपलब्ध न झाल्यामुळे त्यांना अर्ज निश्चिती करता आली नाही.त्यामुळे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने या प्रवेश प्रक्रियेस ३ जून पर्यंत मुदतवाढ दिली आहे. जेविद्यार्थी दहावीनंतरच्या अभियांत्रिकी पदविकेस प्रवेश घेऊ इच्छितात,अशा विद्यार्थ्यांनी या कालावधीमध्ये आपले प्रवेश निश्चित करून घ्यावेत.डिप्लोमा इन इंजिनीअरिंगची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन असून यासाठी सांगोला येथील शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे मान्यताप्राप्त “सुविधा केंद्र” (६४७१) हे सुरू असून १ जूनपासून ही प्रवेश प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. विद्यार्थी व पालक यांनी आपल्या प्रवर्गासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रासह शिवाजी पॉलिटेक्निकच्या सुविधा केंद्रामध्ये येऊन आपल्या पाल्याचा प्रवेश अर्ज भरावा,असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड यांनी केले आहे.

                   यासाठी विद्यार्थी हे दि.३० जूनपर्यंत प्रवेश प्रक्रियेसाठी तंत्रशिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावरून अर्ज छाननीची योग्य पद्धत निवड करून ऑनलाइन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅनड छायाप्रती अपलोड करणे तसेच सुविधा केंद्रामध्ये येऊन प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज निश्चिती करू शकतात. दि.३ जुलै  २०२३ रोजी तात्पुरत्या गुणवत्ता याद्या मंडळाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित केल्या जातील. दि.४ जुलै ते ५ जुलै २०२३ पर्यंत सर्व प्रकारच्या उमेदवारांसाठी तात्पुरत्या गुणवत्ता याद्यामध्ये कांही त्रुटी असल्यास विद्यार्थी त्या त्रुटींचे सुविधा केंद्रांमध्ये येऊन निराकरण करून घेऊ शकतात. दि.७ जुलै रोजी मंडळाच्या संकेत स्थळावर अंतिम गुणवत्ता याद्या प्रदर्शित करण्यात येतील. अधिक माहितीसाठी विद्यार्थी व पालकांनी शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमधील सुविधा केंद्र प्रमुख प्रा.जी.एस.भोसले यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड व प्राचार्य डाॅ.आर.ए.देशमुख यांनी केले आहे.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button