येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीसाठी संघटना बांधणीला गती द्या – युवासेना विस्तारक उत्तम आयवळे

 

सांगोला :

       आगामी काळात होणार्‍या जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगरपालिका व ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी संघटना बांधणीसाठी कामाला लागा, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना सोलापूर जिल्हा विस्तारक उत्तम आयवळे यांनी सांगोला येथील युवासेना बैठकीत केले.

सांगोला येथील सदानंद हाॅटेल येथे युवासेनेची महत्त्वपूर्ण बैठक शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांचे अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी बोलताना उत्तम आयवळे पुढे म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना विषयी प्रचंड सहानभुती व गद्दारां विरोधात प्रचंड संताप आहे. सर्वसामान्य जनता निवडणुकांची वाट पाहत आहे.मात्र,ही लढाई जिंकण्यासाठी आपले संघटन देखील मजबूत असायला हवे. बुथ प्रमुखांपासून,शाखा प्रमुख,गट प्रमुख,विभाग प्रमुख,उपतालुकाप्रमुख,तालुकाप्रमुख यांनी आपली जबाबदारी ओळखून काम करणे गरजेचे आहे. प्रत्येक जिल्हा परिषद गट,पंचायत समिती गण तसेच ग्रामपंचायत वाॅर्डातील समस्या,मतदार याद्या,स्थानिक समीकरणे यांची खडानखडा माहिती घेऊन त्यादृष्टीने काम केले पाहीजे,असे त्यांनी यावेळी सांगीतले.

यासमयी, अनेक नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडी देखील आयवळे यांच्या हस्ते करण्यात आल्या.तसेच पदं घेऊन काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना देखील त्यांनी खडे बोल सुनावले.याप्रसंगी,शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे,युवासेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे,तालुका समन्वयक भारत मोरे,उपजिल्हाप्रमुख रघुनाथ गायकवाड,युवासेना तालुकाप्रमुख सुभाष भोसले,तालुका समन्वयक शंकर मेटकरी,शहरप्रमुख सौरभ चव्हाण,शाखाप्रमुख समाधान चव्हाण,आरोग्य सेना समन्वयक नवल गाडे,विभागप्रमुख रघुनाथ आयवळे यांच्यासह पदाधिकारी व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
————————————————

ज्यांना आपण जिवाचे रान करून आमदार केले ते गद्दार झाले.आगामी निवडणुकीत त्याचा पुरता बिमोड करू व सांगोला तालुक्यातील गद्दारांना धडा शिकवू.
                        – शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे
—————————————————————————