शैक्षणिक

दीपकआबा प्राथमिक शिक्षक सह.पतसंस्थेच्या चेअरमनपदी विलास डोंगरे तर,व्हाईस चेअरमनपदी गोविंद भोसले

सांगोला :

प्राथमिक शिक्षकांना अल्पदराने पतपुरवठा करणाऱ्या सांगोला येथील दीपकआबा साळुंखे-पाटील प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी विलास डोंगरे यांची तर व्हाईस चेअरमनपदी गोविंद भोसले यांची नुकतीच निवड करण्यात आली.

सांगोला येथील दीपकआबा साळुंखे-पाटील प्राथमिक शिक्षक सह.पतसंस्थेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी वरील दोघांचेच अर्ज आल्यामुळे अध्यासी अधिकारी अमर गोसावी यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली. निवडीनंतर दोघांचेही सर्व उपस्थितांनी अभिनंदन केले. याप्रसंगी मावळते चेअरमन माणिक मराठे यांचेसह अनेकांनी आपली मनोगते व्यक्त करुन नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
        यावेळी बोलताना नूतन चेअरमन विलास डोंगरे व व्हाईस चेअरमन गोविंद भोसले यांनी संस्थेचा कारभार सर्व सभासदांना विश्वासात घेऊन पारदर्शकपणे केला जाईल,असे सांगितले.

याप्रसंगी संचालक तानाजी साळे,वसंत बंडगर,संजय गायकवाड,कमल खबाले,पल्लवी मेणकर,तज्ञ संचालक कैलास मडके,सचिव अमर कुलकर्णी, प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष सुहास कुलकर्णी,तानाजी खबाले,विकास साळुंखे, तालुकाध्यक्ष मोहन अवताडे,संजय काशीद,संतोष निंबाळकर,विश्वंभर लवटे,मनोहर काशीद,उमेश महाजन,नवनाथ साळुंखे,पंकज मसगौडे,संजय सरगर आदी उपस्थित होते.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button