शैक्षणिक

अजनाळेच्या अभिनव पब्लिक स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

सांगोला :

अजनाळे (ता.सांगोला) येथील अभिनव पब्लिक स्कूलमध्ये मेजर तानाजी लिंगडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन विवीध कार्यक्रमाद्वारे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी संस्थाध्यक्ष शिवाजी लाडे सर,मुख्याध्यापिका कावेरी गिड्डे,सतीश येलपले पोलीस,आकाश पाटील, पांडुरंग लाडे,मधुकर शेंबडे,परमेश्वर लाळगे,लक्ष्मण पाटील,रवी लोकरे,विशाल पाटील तसेच अतुल येलमर आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

         याप्रसंगी,विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या कवायती सादर केल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून भारतीय संविधानाचे महत्त्व स्पष्ट केले.तसेच अनेक क्रांतिकारकांच्या जीवनातील प्रेरणादायक घटनांचा आढावा घेत,शेतकऱ्यांच्या व्यथा व देशभक्तीपर गीत सादर केले.तर,भारती सर यांनी आपल्या मनोगतातून भारतीय संस्कृतीचा परिचय विद्यार्थ्यांना करुन दिला. मेजर तानाजी लिंगडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळा प्रशासन व विद्यार्थी विकास याबाबत समाधान व्यक्त करत सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी,मान्यवरांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता खाऊ वाटपाने करण्यात आली.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा कदम यांनी केले तर,आभार प्रदर्शन वंदना शिंदे यांनी केले.  कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button