यात्रेचे कामकाज पाहणार ६ कोर्ट रिसिव्हर
सांगोला :
सांगोला शहरातील खास आकर्षण असलेली अंबिकादेवीची यात्रा ही गुरुवार दि.३० जानेवारी पासून भरणार असून शुक्रवार दि.७ फेब्रुवारी रोजी आकर्षक दारुकामाने यात्रेची सांगता करण्यात येणार असल्याची माहिती कोर्ट रिसीव्हर तथा सहाय्यक सरकारी वकील अॅड.सारंग वांगीकर यांनी दिली.
सांगोला येथे ३० जानेवारीपासून सुरु होणार्या यात्रा कालावधीत नेहमीप्रमाणे शेती विषयक प्रदर्शन, विद्यार्थ्यांच्या व महिलांच्या विविध स्पर्धा,जंगी कुस्त्यांचा कार्यक्रम व शोभेचे दारुकाम आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (मार्केट कमिटीच्या) आवारात यात्रा भरणार असून यात्रेत विवीध प्रकारचे स्टाॅल लावणार्या व्यावसायिकांकरिता रस्त्याच्या दुतर्फा जागा उपलब्ध करुन देण्यासाठी मंगळवार दि.२८ व बुधवार दि.२९ जानेवारी रोजी जागा वाटप करण्यात आले.
यंदा यात्रेत पाळणे,खेळण्याची दुकाने,मिठाई व स्पेशल जिलेबीची दुकाने,गृहउपयोगी वस्तू,सौंदर्य प्रसाधने, मनोरंजनाची साधने,शेतीची औजारे आदी विक्री करणारे लहान-मोठे व्यावसायिक मोठ्या संख्येने येणार असल्याने दुकानदारांची व व्यावसायिकांची रेलचेल असणार,अशी माहिती कोर्ट रिसिव्हर तथा सहाय्यक सरकारी वकील अॅड.सारंग वांगीकर, अॅड.विक्रांत प्रकाश बनकर,अॅड.विशालदीप विजयसिंह बाबर,अॅड.नितीन गुलाबराव बाबर,अॅड. शशिकला सुधीर खाडे,अॅड.महेंद्र मारुती पत्की यांनी दिली.
——————————————————————————
यात्रेचे कामकाज पाहणार ६ कोर्ट रिसिव्हर :
सांगोला शहरात दरवर्षी सांगोला येथील श्री अंबिकादेवी यात्रा व प्रदर्शन समितीच्या वतीने यात्रा भरवली जाते.श्री अंबिकादेवी यात्रा व प्रदर्शन समितीमधील अंतर्गत वादासंदर्भात पंढरपूर येथील जिल्हा न्यायालयात गेल्या अनेक वर्षापासून दावा दाखल असून तो अद्याप प्रलंबीत आहे.त्यामुळे,दरवर्षी यात्रेचे कामकाज हे कोर्ट रिसिव्हरमार्फत पार पाडले जाते.
चालूवर्षी,अंबिकादेवी यात्रेचे कामकाज पाहण्यासाठी पंढरपूर येथील मा.जिल्हा न्यायाधीश यांनी कोर्ट रिसीव्हर म्हणून सहाय्यक सरकारी वकील अॅड.सारंग वांगीकर, अॅड.विक्रांत प्रकाश बनकर, अॅड.विशालदीप विजयसिंह बाबर,अॅड.नितीन गुलाबराव बाबर,अॅड.शशिकला सुधीर खाडे व अॅड.महेंद्र मारुती पत्की या ६ वकीलांची नेमणूक केली आहे.
More Stories
आपुलकी प्रतिष्ठानचा गुंफण सामाजिक पुरस्काराने गौरव
स्व.आमदार काकासाहेब साळुंखे-पाटील यांच्या जयंती निमीत्त बुधवारी जवळा येथे समाधी दर्शन सोहळा
कर्करोग तपासणी व जनजागृतीसाठी सांगोल्यात रोटरी क्लबने काढली रॅली