सांगोला पं.स.च्या वतीने “लेक वाचवा,लेक शिकवा” अभियान संपन्न
सांगोला :
सांगोला पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त “लेक वाचवा लेक शिकवा” अभियान अंतर्गत तालुकास्तरीय किशोरी हितगुज व जनजागृती मेळावा राजूरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकताच घेण्यात आला.या मेळाव्यात मुलींसाठी विविध स्पर्धा, कर्तृत्ववान महिलांच्या मुलाखती,गीतमंच व व्याख्यान अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सांगोला तालुक्यातील राजूरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात झालेल्या या तालुकास्तरीय किशोरी हितगुज मेळाव्याचे उदघाटन माजी सभापती राणीताई कोळवले,माजी उपसभापती शोभा खटकाळे,डॉ.प्रज्ञा लवटे,सरपंच प्रतिभा व्हळगर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मारुती सुतार, उपाध्यक्ष गोपीनाथ दबडे यांचे हस्ते करण्यात आले.याप्रसंगी माजी उपसभापती नारायण जगताप, गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले,शिक्षण विस्तार अधिकारी लक्ष्मीकांत कुमठेकर,अमोल भंडारी, केंद्रप्रमुख दिनकर गाडे,केंद्रप्रमुख अस्लम इनामदार, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर करांडे आदी उपस्थित होते. जि.प.प्राथमिक शाळा बाबर-सपताळवाडी शाळेतील विद्यार्थीनी भक्ती प्रशांत केदार ही कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होती.
प्रारंभी,उपस्थित विद्यार्थिनींना व्यायाम व योगाचे महत्त्व सांगण्यात आले.रुपाली पवार व सीमा करांडे यांनी योगासनांचे प्रात्यक्षिक करुन दाखविले व मुलींकडून करुन घेण्यात आले.यानंतर सांगोला तालुका प्राथमिक शिक्षक गीतमंच स्वरसाधनेच्या माध्यमातून संगीता केसकर,सरला खाडे,वैशाली शिलेदार,सावित्रा कस्तुरे,सुभाष भडंगे,एकनाथ गुरव, तानाजी गायकवाड,श्रीनिवास हातेकर,कृष्णदेव शिंदे, अशोक शिंदे,समाधान ढेकळे,शिवाजी गुळीक,पल्लवी देशपांडे,ज्योती पवार आदी शिक्षकांनी शिक्षणाचे महत्त्व,मुलींचे शिक्षण यावर बहारदार गीते सादर केली. या कार्यक्रमात डॉ.प्रज्ञा लवटे यांनी किशोरवयीन मुलींना मासिक पाळी व्यवस्थापन व आरोग्य विषयक मार्गदर्शन केले.तसेच लिंग समभाव,शिक्षणाचे महत्व, स्वच्छता व मुलींचे आरोग्य यावर विविध वक्त्यांनी मार्गदर्शन केले.
माजी जि.प.सदस्य तानाजी सुर्यगण यांनी संविधान विषयक मार्गदर्शन केले.तर,मनीषा क्षीरसागर व स्मिता शिंदे यांनी मुलींना गुड टच,बॅड टच याबाबत प्रात्यक्षिकासह सखोल मार्गदर्शन केले व सजग राहण्याचा सल्ला दिला.यावेळी मुलींसाठी असणाऱ्या विविध शैक्षणिक सुविधांची माहितीही या मेळाव्यात देण्यात आली.मुलींनी स्वसंरक्षण कौशल्ये आत्मसात करावीत.त्यासाठी बाळकृष्ण बंडगर यांनी कराटे प्रात्यक्षिके सादर केली.यामध्ये उदनवाडी शाळेतील मुली सहभागी झाल्या होत्या.या मेळाव्यात मुलींसाठी “कर्तबगार महिला”,”बेटी बचाओ-बेटी पढाओ”,”स्वच्छ विद्यालय-स्वच्छ भारत” या विषयावरती पोष्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.तसेच यावेळी रांगोळी,चित्रकला,हस्ताक्षर,लोकनृत्य स्पर्धा घेण्यात आल्या.लोकनृत्य स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अनुपमा गुळमिरे व पल्लवी थोरात यांनी काम पाहिले.यानंतर झालेल्या सांस्कृतीक कार्यक्रमामध्ये वाणीचिंचाळे प्राथमिक शाळेतील मुलींनी बहारदार लोकनृत्ये सादर केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना पाटणे यांनी केले.तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पतंगराव बाबर,कृष्णदेव पवार,संतोष आदाटे,गंगाधर जुंधळे, तोहेरपाशा काझी,सचिन धोकटे,रुपाली पवार,सीमा करांडे,शहनाज आतार,सुमन बगले,वैशाली भोसले, श्रद्धा जिरगे,लता पाटील,अनिता वारुळे,वैशाली शिलेदार,सरला शिर्के,वर्षा बडे,सोनल सावंत यांचेसह जुनोनी व परिसरातील शाळांमधील शिक्षकांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य,ग्रामस्थ व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————————————————————
More Stories
माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानतर्फे किशोरी साठी ‘प्रेम,मैत्री व आकर्षण’ कार्यक्रम संपन्न
मरायला नाही तर,जगायला खूप हिंमत लागते – प्रा.डॉ.सुनिता बोर्डे-खडसे
अभिनव पब्लिक स्कूलमध्ये ‘अभिनव बिग बझार’ उपक्रम उत्साहात संपन्न