सांगोला :
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) कुलदीप जंगम यांनी जिल्हा परिषदेचे ॲडिशनल सीईओ,डेप्युटी सीईओ व खाते प्रमुख यांच्या उपस्थितीत सांगोला पंचायत समिती मधील खातेप्रमुख व ग्रामपंचायत अधिकारी यांची नुकतीच आढावा बैठक घेतली.

सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) कुलदीप जंगम यांनी दौर्याच्या दिवशी सकाळी ८ वाजताच सांगोला तालुक्यातील वाढेगाव येथे “डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन” योजनेच्या विहीर लाभार्थीची भेट घेऊन पाहणी केली. तसेच गौडवाडी येथील बायोगॅस व सोलर टॅपचीही पाहणी केली.यावेळी त्यांचे सोबत गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी,सहाय्यक गटविकास अधिकारी वसंत फुले,कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे,कृषी अधिकारी दिपाली शेंडे इ.उपस्थित होते.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर,प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) ईशादीन शेळकंदे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छ भारत मिशन) अमोल जाधव,कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे,नरेगा गटविकास अधिकारी अरुण वाघमोडे,लेखा अधिकारी रुपाली रोकडे,जिल्हा कृषी अधिकारी सागर बारवकर उपस्थित होते.
यावेळी सर्व कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यामध्ये दलित वस्ती कामकाज,घरकुल स्वच्छ भारत मिशन,१५ वित्त आयोग,सेवानिवृत्त प्रकरणे,पेन्शन प्रकरणे व आयुक्त तपासणी शक,जलजीवन मिशन याबाबत सविस्तर आढावा घेऊन संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत.या कार्यक्रमाची प्रस्तावना ही गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी यांनी केली.तर,सूत्रसंचलन व आभारप्रदर्शन विस्तार अधिकारी (आरोग्य) मिलिंद सावंत यांनी केले.
——————————————————————————
घरकुलाचे काम वेळेत पूर्ण न झाल्यास लाभार्थ्यांवर गुन्हे दाखल करा :
केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांबाबत मंजूर घरकुले सुरु करणे,घरकुलांचे काम वेळेत पूर्ण करणे.जर घरकुलाचे काम वेळेत पूर्ण न झाल्यास संबंधित लाभार्थ्यांवर गुन्हे दाखल करावेत.तसेच संबंधित सरपंच व ग्रामसेवक यांना जबाबदार धरुन पुढील कारवाई करावी.
– सीईओ कुलदीप जंगम
More Stories
जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोले नगरपरिषदेचा दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक,पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजा माने