सांगोला :
सांगोला येथील रामकृष्ण टेक्निकल एज्युकेशन सोसायटी संचलित,शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमधे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून सांगोला येथील रेवनील ब्लड बँक व शिवाजी पॉलीटेक्निक कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना यांचे संयुक्त विद्यमाने काल शुक्रवारी विद्यार्थिनींसाठी हिमोग्लोबिन तपासणी शिबिर व रक्तदान शिबिर संपन्न झाले.
या रक्तदान शिबिराचे उदघाटन सांगोला शहरातील नामवंत डॉक्टर डाॅ.शैलेश डोंबे,डॉ.अजिंक्य नष्टे,डॉ. बसवराज पाटील,डॉ.विजय फुले तसेच संस्थेचे सचिव अंकुशराव गायकवाड,युवा विश्वस्त डॉ.यशोदीप गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी,प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

शिवाजी पॉलीटेक्निक कॉलेजच्या तब्बल १०१ विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान करुन सामाजिक कार्यात योगदान दिले.सामाजिक कार्यात संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज नेहमीच अग्रेसर राहिले असल्याचे यावेळी प्रमुख पाहुण्यांनी सांगीतले.तसेच यावेळी २१० विद्यार्थिनींची हिमोग्लोबिन तपासणीही करण्यात आली.बालिका दिनाचे औचित्य साधून सांगोला येथील नामवंत स्त्रीरोग तज्ञ डॉ.मेघना देवकते यांचे महिलांचे मानसिक व शारीरिक आरोग्य या विषयावर विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शन सत्र संपन्न झाले. यावेळी बोलताना त्यांनी विद्यार्थिनींनी कशाप्रकारे आपल्या मानसिक व शारीरिक आरोग्याची काळजी घ्यायला हवी,याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
सदर रक्तदान शिबिर व आरोग्य विषयक व्याख्यान संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कॉलेजचे प्राचार्य डॉ.आर.ए. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी करण्यासाठी समन्वयक प्रा.पृथ्वीराज लिगाडे, प्रा.दीपाली जुगदर,प्रा.श्रेया कुलकर्णी,सर्व विभाग प्रमुख,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.
——————————————————————————
More Stories
माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानतर्फे किशोरी साठी ‘प्रेम,मैत्री व आकर्षण’ कार्यक्रम संपन्न
मरायला नाही तर,जगायला खूप हिंमत लागते – प्रा.डॉ.सुनिता बोर्डे-खडसे
अभिनव पब्लिक स्कूलमध्ये ‘अभिनव बिग बझार’ उपक्रम उत्साहात संपन्न