सांगोला :
अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या आणि खातेदारांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या सांगोला येथील श्री धनलक्ष्मी क्रेडिट को-ऑप सोसायटीच्या सन २०२५ च्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा काल शनिवारी ४ जानेवारी रोजी पत्रकार बांधव व मान्यवरांच्या हस्ते पार पडला.
यावेळी संस्थेचे मार्गदर्शक शहाजीदाजी नलवडे,श्री धनलक्ष्मी क्रेडिट को-ऑप.सोसायटीचे चेअरमन अभिजीत नलवडे,व्हा.चेअरमन डॉ.शिवराज भोसले, संचालक अशोकभाऊ शिंदे,मोहन साळुंखे,तुकाराम आबा जाधव,डॉ.दत्तात्रय इंगोले,डॉ.दत्तात्रय अर्जुन, सचिव काकासाहेब मोरे,कलमुद्दीन पठाण,सुप्रिया शिंदे,संजय शिंदे यांच्यासह श्रमजीवी पत्रकार संघाचे अध्यक्ष हमीदभाई इनामदार,माजी अध्यक्ष भारत कदम,सचिव अरुण लिगाडे,पत्रकार सचिन भुसे,सुरज लवटे,हमीद बागवान,रोहित सूर्यगण,सुरेश गंभीरे,सुधीर कोले,संतोष येडगे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अहवाल वाचन करताना कलमुद्दीन पठाण यांनी सांगीतले की,संस्थेची स्थापना १ एप्रिल २०२१ रोजी झाली असून संस्थेचे भाग भांडवल ५० लाख रुपये आहे तर,खेळते भाग भांडवल हे ४ कोटी ६० लाख रुपये आहे. तसेच ३ कोटी १० लाख २५ हजार रुपयांच्या ठेवी जमा आहेत.१ कोटी १६ लाख रुपयांची गुंतवणूक असून ३ कोटी ११ लाख रुपये कर्ज येणे आहे.चालूवर्षी ९ लाख ४९ हजार ५८३ रुपये नफा असून संस्थेच्या ऑडिट वर्गामध्ये सतत संस्थेचा ‘अ’ वर्ग राहिला आहे. आज अखेर संस्थेकडून ५ कोटी ३० लाख रुपये कर्ज वितरण करण्यात आले आहे. तर ५ टक्केच्या आत थकबाकी असल्याचेही अहवालातून सांगण्यात आले आहे.यावेळी संस्थेच्या नवनवीन योजने संदर्भात व ऑनलाईन आरटीजीएस, एन एफ टी,एसएमएस सुविधा याबाबत सचिव काकासाहेब मोरे यांनी सविस्तर माहिती दिली.
श्री धनलक्ष्मी क्रेडिट को-ऑप सोसायटीच्या विविध योजना,ठेवी वरील आकर्षक व्याज,सोने तारण कर्ज योजना याची परिपूर्ण माहिती तसेच प्रत्येक दिवसाचे महत्व व दिनविशेष,राशी भविष्य,गृह प्रवेश, लग्न मुहूर्त,अशी सर्व माहिती देणार्या दिनदर्शिकेचा प्रकाशन कार्यक्रम श्री धनलक्ष्मी क्रेडिट को-ऑप सोसायटी कार्यालयात संपन्न झाला.श्री धनलक्ष्मी क्रेडिट को-ऑप सोसायटी च्या वतीने यापुढेही प्रत्येक वर्षी दिनदर्शिका प्रकाशन सोहळा आयोजित केला जातो असेही सांगण्यात आले. दिनदर्शिका प्रकाशन कार्यक्रमासाठी श्री धनलक्ष्मी क्रेडिट को-ऑप सोसायटीचे संचालक,मॅनेजर,कर्मचारी व पिग्मी एजंट यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवर,सभासद व हितचिंतक उपस्थित होते.
——————————————————————————
More Stories
जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोले नगरपरिषदेचा दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक,पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजा माने