सामाजिक

सांगोल्यात जय मल्हार क्रांती संघटनेची सोमवारी बैठक

 

सांगोला :

                             जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलतनाना शितोळे व महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रमुख पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत दि.१२ जानेवारी रोजी होणार्‍या वार्षिक आढावा बैठकीच्या अनुशंगाने पुढील नियोजनासाठी सोमवार दि.६ जानेवारी रोजी दुपारी
सांगोला येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस सांगोला तालुक्यातील जय मल्हार क्रांती संघटनेच्या सर्व पदाधिकार्‍यांनी अवश्य उपस्थित रहावे,असे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमेश मंडले यांनी केले आहे.

                             जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलतनाना शितोळे व महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रमुख पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत दि.१२ जानेवारी रोजी दुपारी ११ ते ३ या वेळेत श्रीगणेश मंगल कार्यालय, महुदरोड,सांगोला येथे जय मल्हार क्रांती संघटनेची वार्षिक आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.या वार्षिक आढावा बैठकीच्या नियोजनासाठी तालुक्यातील जय मल्हार क्रांती संघटनेच्या सर्व पदाधिकार्‍यांनी सांगोला येथील श्री अंबिका मंदिरात सोमवार दि.६ जानेवारी रोजी दुपारी १ वा.वेळेवर उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमेश मंडले यांनी सांगीतले.

   सदर आढावा बैठकीदरम्यान,नवीन पदाधिकार्‍यांच्या निवडीही केल्या जाणार आहेत.जय मल्हार क्रांती संघटनेत काम करण्याची आवड असणाऱ्या इच्छुक समाज बांधवांनी (९९२२३९९५८८/ ९७३०३७०८८८/ ९०११२७९९६४) या नंबरवर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात येत आहे.तसेच या कार्यक्रमात जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते दौलतनाना शितोळे यांची उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी (राज्यमंत्री दर्जा) निवड झाल्याबद्दल व सांगोल्याचे विद्यमान आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य व समाज बांधवांच्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button