सिंहगड स्टाफ स्पोर्ट्स लीग २०२४-२५ : क्रीडा व उत्सव एकतेच्या माहोलात मोठ्या दिमाखात संपन्न

सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.एम.एन.नवलेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्पर्धेचे आयोजन

सांगोला :

सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक व शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व प्रो.एम.एन.नवले सर यांच्या वाढदिवसानिमित्त सिंहगड इन्स्टिट्यूटने आयोजित केलेल्या सिंहगड स्टाफ स्पोर्ट्स लीग २०२४-२५ चा दुसरा हंगाम क्रीडा व उत्सव हा एकतेच्या माहोलात मोठ्या दिमाखात पार पडला.

या प्रतिष्ठित स्पर्धेचे आयोजन डॉ.सुनंदा नवले मॅडम (व्हॉइस प्रेसिडेंट,एसटीइएस,पुणे),डॉ.रचना नवले-अष्टेकर मॅडम (व्हॉइस प्रेसिडेंट,अॅडमिन एसटीइएस, पुणे), आणि डॉ.रोहित नवले (व्हॉइस प्रेसिडेंट,एचआर एसटीईएस,पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.या स्पर्धेने सिंहगड संस्थेच्या विद्यार्थ्यांबरोबरच कर्मचाऱ्यांच्या कौशल्यांनाही प्लॅटफॉर्म दिला.
संपूर्ण स्पर्धा क्रीडा कौशल्य,संघभावना आणि मैत्रीच्या मूल्यांनी परिपूर्ण होती.वैशिष्ठ्य म्हणजे,या स्पर्धेत एसपीएस,सोलापूर लायन्स संघाने हॉलीबॉलमध्ये चमकदार खेळी दाखवत सर्वांची मने जिंकली.

या लीगमध्ये क्रिकेट,हॉलीबॉल,ॲथलेटिक्स,स्विमिंग, टेबल टेनिस,लॉन टेनिस,स्नूकर यांसारख्या विविध खेळांचा समावेश करण्यात आला होता.या खेळांनी कर्मचाऱ्यांमध्ये नवीन ऊर्जा व प्रेरणा निर्माण केली.या स्पर्धेत महिला क्रिकेटदेखील प्रथमच समाविष्ट करण्यात आले होते,ज्यामध्ये महिला खेळाडूंनी आपल्या कौशल्यांचे शानदार प्रदर्शन केले आणि स्पर्धेला एक नवीन उंची दिली.त्यांच्या खेळातील उत्साहाने प्रेक्षकांची मने जिंकली आणि या उपक्रमाला अधिक समृद्ध केले.

              सिंहगड स्टाफ स्पोर्ट्स लीग ही आता संस्थेचा एक महत्त्वाचा उपक्रम ठरली आहे. एसपीएसपीएम संस्थेचे सहसचिव संजय नवले सर,सिंहगड इन्स्टिट्यूट, कमलापूरचे कॅम्पस डायरेक्टर अशोक नवले सर तसेच सिंहगड पब्लिक स्कूल,कमलापूरचे प्राचार्य चेताली मराठे मॅडम,सिंहगड पब्लिक स्कूल,सोलापूरच्या प्राचार्य निखहत शेख मॅडम आदींनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.सिंहगड इन्स्टिट्यूटच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
——————————————————————————

एसपीएस,सोलापूर लायन्स संघाने हॉलीबॉलमध्ये चमकदार खेळी दाखवत मिळवला दणदणीत विजय :

या स्पर्धेत सिंहगड इन्स्टिट्यूट, सोलापूर आणि सिंहगड इन्स्टिट्यूट,कमलापूर या दोन्ही कॅम्पसच्या कर्मचाऱ्यांचा मिळून एकच संघ तयार करण्यात आला होता. हॉलीबॉल या क्रीडाप्रकारात एसपीएस लायन्स,सोलापूर या संघाने एलएनएल वॉरियर, लोणावळा विरुद्ध अंतिम सामन्यात चमकदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात एसपीएस, सोलापूर लायन्स संघाने आपली प्रबळ कामगिरी सिद्ध करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली आणि हॉलीबॉलमध्ये चमकदार खेळी दाखवत सर्वांची मने जिंकली.त्यांच्या या यशाने संपूर्ण संस्थेचा गौरव वाढवला.

एकतेचा संदेश आणि संस्थेचा गौरव :

ही स्पर्धा केवळ क्रीडाप्रेमींसाठीच नव्हेतर,संपूर्ण सिंहगड परिवारासाठी एकतेचा संदेश देणारी ठरली. संस्थेतील कर्मचाऱ्यांमधील लपलेल्या कौशल्यांना हक्काचे व्यासपीठ मिळाल्याने प्रत्येकजण आनंदी आणि उत्साही होता.

 

संस्थेचा सक्रिय पाठिंबा आणि खेळाडूंचे यश :

या स्पर्धेत एसपीएसपीएम संस्थेचे सहसचिव संजय नवले सर आणि सिंहगड इन्स्टिट्यूट, कमलापूरचे कॅम्पस डायरेक्टर अशोक नवले सर यांनी कर्मचारी खेळाडूंना प्रोत्साहन दिले,ज्यामुळे या खेळाडूंनी स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केली.त्यांच्या पाठिंब्यामुळेच कर्मचारी खेळाडूंनी स्पर्धेत चमकदार यश मिळवले.

गणेश पवार सर यांनी स्पर्धेमध्ये आपल्या अप्रतिम खेळाने ‘मॅन ऑफ द मॅच पुरस्कार’ पटकावला आणि त्याचबरोबर स्पर्धेतील बेस्ट लिफ्टरचा खिताबही जिंकला.
शहानवाज मुजावर सर यांना चुरशीच्या अंतिम सामन्यातील ‘मॅन ऑफ द मॅच’ खिताबाने गौरविण्यात आले.त्यांच्या खेळातील अचूकतेने निर्णायक विजयाला चालना दिली.
प्रविण मोहिते सर यांनी ‘बेस्ट स्ट्रायकर ऑफ द टूर्नामेंट’ म्हणून आपली ओळख निर्माण केली.