
* मानव महंमद *
महमंद झाला जहासर्व खरा ।। त्यागीले संसारा ।। सत्यासाठीं ।।
खोटा धर्म सोडा, सांगे जगताला ।। जन्म घालविला ।। ईशापायीं ॥१॥
जगहितासाठी लिहिलें कुराण ।। हिंमतीचा राणा ।। जगीं वीर ॥२॥
जगाचा पालक निर्मोक अनादि ।। सर्व काळ बंदी ।। निकेँ सत्य ॥३॥
मन केलें धीट, धरीली उमेद ।। नाहीं भेदाभेद ।। ठावा ज्याला ॥४॥
जनहितासाठी खोटा अभिमान ।। दिला झुगारून ॥ अग्नीमध्यें ॥५॥
सर्द महंमद ढोंग्यांत पांगळा ।। शोभला पुतळा ॥ सज्जनांत ॥६॥
नव्हता कोणी त्याला तेव्हां साह्यकरी ॥ एकटाच सारी ।। सत्य पुढे ॥७॥
एक त्याला फक्त सत्याचा आधार ।। हिय्या समशेर ।। मनामध्यें ॥८॥
++++ य येई अजा । निर्मीकाच्या ध्वजा ।। उभारील्या ॥९॥
कोणी नाहीं श्रेष्ठ कोणी नाहीं दास ।। जात-प्रमादास ।। खोडी बुडी ॥१०॥
मोडीला अधर्म आणि मतभेद ।। सर्वांत अभेद ॥ ठाम केला ॥११॥
केल्या कमाईचा न धरी अभिलाष ।। खैरात दिनास ।। देई सर्व ।।१२।।
मानवी मनाचा घेई अंतीं ठाव ।। कल्याणाची हाव।। पोटीं माया ॥१३।।
मूर्तीपूजकांच्या बंडासी मोडीलें ।। ढोंगी वळविले ॥ ईशाकडे ॥१४॥
देव एक ऐसें ग्रंथासी स्थापिलें ।। जग-बंधु केलें ।। मनुजास ।।१५।।
तेणें धर्मगुरु तप्तची जहाले।। हट्टासी पेटले ॥ मूर्तीसाठीं ॥१६॥ ढोंगी धर्मोकांनी पाठलाग केला ।। विवरीं लपला ।। डोंगराच्या ॥१७॥ ईश रक्षी त्याला लंड वधूं गेले ।। शोधीत फिरले ।। सर्व व्यर्थ ॥१८॥ मेल्यामागें बहु त्याचे शिष्य झाले ।। बळीस्थानी आले ।। किती एक ॥१९॥ कळं आले त्यांना आर्याजी अभद्र ।। मुक्त केले शूद्र ॥ दास्यांतून ॥२०॥ इस्लामा प्रसारी, आर्या घशीं पाडी ।। खीळी सत्य-बिडी ।। त्यांचे पायीं ।।२१।। आर्य दस्यु इस्लामानें मुक्त केले ।। ईशाकडे नेले ।। सर्व काळ ।।२२।। आर्यधर्म-भंड इस्लामें फोडीलें ।। ताटांत घेतले ।। भेद नाहीं ॥२३॥ मांगासह आर्या नेलें मसीदींत ॥ गणी बांधवांत ।। आप्त सबै ।।२४।। क्षत्रिया जिंकलें राज्य त्यांचें झालें ॥ मोंगलांनीं केले ।। मुक्त कांहीं ।।२५।। जातिभेदाभेदी फायदा तो साचा ।। मुसलमानांचा ।। झाला मोठा ।।२६।। अंत्यजास धरी पोटीं सावकाश ॥ लाजवी आर्यास ।। सर्व काळ ॥२७॥ म्हणूनीयां आर्य बोंब मारीताती ॥ शिमगा खेळती ॥ ब्रह्मरूपी ॥२८॥ भेद सोडुनीयां एका ताटीं खाती ॥ एकच बनती ।। म्हणोनीयां ।।२९।। इस्लामासी मान शूद्र राजे देती ।। कर्बलास नेती ।। ताबूतास ।।३०।। इस्लामी बांधव अचंबा करीती ॥ धूळ फेकीताती ॥ मनूवर ।।३१।। मनुस्मृति आहे पाखांडाची मुळी ।। गिर्वाणाचे तळीं ।। विळपळे ॥३२॥ कणकणीच्या गाई ब्राह्मण भक्षीती ।। कां रे चिडवीती, मुसलमाना ? ॥३३।। आर्य गाई खाती, वरी शुद्ध होती ।। शुद्रा लढवीती ।। जोती दावी ।।३४।।
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
!! ईद-ए-मिलादच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!
* शुभेच्छुक – शंकरराव लिंगे *
राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ
More Stories
प्रलंबित तांत्रिक वेतनश्रेणीसाठी भूमी अभिलेखच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
एलसीबीच्या ख्वाॅजा मुजावरना मिळाली बढती अन् बनले फौजदार
देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पिल्लावळ सोलापुरात घडविणार होती दंगल – खासदार प्रणिती शिंदेंचा आरोप