थांबेल का ती ?

 

….थांबेल का ती ?

दररोज दिसते…
समोरून जाते !
वाटलं होतं…
थांबेल ती !
हाक देऊनही..
नाही थांबली !
म्हणूनच…
वाईट वाटतं!
प्रतिक्षा आहे…
एक दिवस
असा येईल…
आणि थांबेल ती !
इतरांप्रमाणेच…
आम्हालाही बरोबर
घेऊन जाण्यासाठी !
दररोज समोरून..
न बघता जाणारी ती !
कधीतरी बघेलच…
या आशेवर !
आम्ही सांगोलेकर…
तिच्याच थांब्याच्या प्रतीक्षेत !
कलबुर्गी कोल्हापूरच्या ..
थांब्यासाठी….
आतुरलेले प्रवासी !!
                           राजेंद्र यादव, सांगोला
(मो.9423969644)