
सांगोला :
येत्या ९ आँक्टोबर रोजी शांतीदूत तथा इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर (स्वल्लल्लाहु अलैही वसल्लम) यांची जयंती म्हणजेच जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी असून त्यानिमित्त सांगोला येथे दि.२८ सप्टेंबर तसेच ७ आँक्टोबर,८ आँक्टोबर व ९ आँक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून मोहम्मद पैगंबर (स्वल्लल्लाहु अलैही वसल्लम) यांनी केलेले कार्य, त्यांनी जगाला दिलेला शांततेचा संदेश व इस्लाम धर्माची केलेली स्थापना याविषयी सुफी संतांचे व्याख्यान (तकरिर) होणार आहे.
दि.२८ सप्टेंबर रोजी “अल्लामा मुफ्ती जहाँगीर साहब आलिमी” यांचे सायंकाळी ५ वा.नंतर सांगोला येथील अलराईननगर येथे प्रवचन (तकरिर) चा कार्यक्रम संपन्न झाला. दि.७ आँक्टोबर रोजी पीर-ए-तरीकत, रहबरे शरीयत नाशीर-ए-मसलक-ए- आला हजरत,अताए हुजूर सोफिए आज़म-ए-हिंद,खतिब-ए-महाराष्ट्र अल्लामा मौलाना हाफिज व कारी “सय्यद अब्दुल मलिकसाहब रिज़वी” खलीफा-ए-सरकार हुज़ूर अफसर मुर्शद (परांडा) यांचे संध्याकाळी ७ वाजल्यानंतर सांगोला शहरातील मुजावर गल्ली येथे प्रवचन (तकरिर) चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर, दि.८ आँक्टोबर रोजी सायंकाळी ५ वा.(असर के बाद) सांगोला शहरातील गरीब नवाज (मणेरी) मस्जिद येथे “आलिमा”(आपाजान) यांचा फक्त महिलांसाठी तकरिरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दि.९ आँक्टोबर रोजी प्रेषित मोहम्मद पैगंबर (स्वल्लल्लाहु अलैही वसल्लम) यांची जयंती म्हणजेच जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी असून त्यानिमीत्त सकाळी ८ वा. शाही जामा मस्जिद (शिवाजी चौक) येथून पैगंबर जयंती (जुलूस) मिरवणूकीस प्रारंभ होईल आणि सालाबादप्रमाणे ठरलेल्या मार्गावरुन मार्गक्रमण करत या मिरवणूकीची शिवाजी चौक येथे सांगता होईल. मिरवणूकीनंतर शाही जामा मस्जिद येथे फातीहाखानीचा कार्यक्रम पार पडेल आणि नंतर आलेल्या सर्व मुस्लीम बांधवांसाठी लंगर खाना (महाप्रसाद) वितरित केला जाईल.
वरील सर्व कार्यक्रमासाठी सांगोला शहर व तालुक्यातील तमाम मुस्लिम बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन जुलूस कमिटीचे चालू वर्षीचे अध्यक्ष हाजी महंमदगौस नाडेवाले यांनी केले आहे.
—————————————————————————
More Stories
जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोले नगरपरिषदेचा दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक,पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजा माने