सांगोला :
सांगोला तालुक्यातील वाकी (घेरडी) येथील मालकी क्षेत्रात विनापरवाना वृक्षतोड करुन त्याची विनापरवाना वाहतूक करणारा मालट्रक जप्त करुन तिघांविरुध्द वनगुन्हा दाखल करण्याची यशस्वी कामगिरी सांगोला वनविभागाने केली असल्याची माहिती सांगोल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर यांनी दिली.
यासंदर्भात माहिती देताना वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर यांनी सांगीतले की, सांगोला वनपरिक्षेत्रामधील मौजे वाकी (घेरडी) येथे वनअधिकारी,सांगोला हे फिरती करत असताना, मालट्रक क्र.एम.एच.१०/झेड-४४४६ या वाहनातून कडूलिंबाचे जळावू लाकूड वाहतूक होत असल्याचे दिसून आल्याने सदर मालट्रक थांबवून ट्रकचालक प्रविण शंकर निमग्रे (रा.वाकी/घेरडी) याचेकडे वृक्षतोड परवाना व वाहतूक परवाना विचारले असता, सदर ट्रकचालकाने वृक्षतोड परवाना व वाहतूक परवाना घेतला नसल्याचे सांगितले.त्यामुळे सदर मालट्रक हा लाकूड मालासह जप्त करुन वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय,सांगोला येथे आणला. तसेच याबाबत ट्रकचालकाकडून सखोल माहिती घेतली असता, वाकी (घेरडी,ता.सांगोला) येथील दामू एकनाथ कोडक यांचे मालकी क्षेत्रातील कडूलिंबाची विनापरवाना वृक्षतोड करुन सुमारे १६ घ.मी.जळावू लाकूड हे मालट्रक क्र.एम.एच.१०/झेड-४४४६ या वाहनातून विनापरवाना वाहतूक होत असल्याचे दिसून आले.
त्यामुळे,वृक्षअधिकारी तथा वनपरिक्षेत्र अधिकारी,सांगोला या कार्यालयाचा वृक्षतोड परवाना व वाहतूक परवाना न घेता, खाजगी मालकी क्षेत्रातील कडूलिंबाची विनापरवाना वृक्षतोड करुन सुमारे १६ घ.मी.जळावू लाकूड (बाजार भावाप्रमाणे अंदाजे किंमत रु.३५,०००/-) हे मालट्रक क्र.एम.एच.१०/झेड-४४४६ या वाहनातून विनापरवाना वाहतूक करुन वनगुन्हा केल्याबद्दल (१) ट्रकचालक प्रविण शंकर निमग्रे (रा.वाकी/घेरडी), (२) विनापरवाना वृक्षतोड करणारा लाकूड व्यापारी शंकर भिवा निमग्रे (रा.वाकी/घेरडी) आणि (३) शेतकरी दामू एकनाथ कोडक (रा.वाकी/घेरडी) यांचेविरुध्द वनरक्षक,घेरडी यांचेमार्फत वनगुन्हा दाखल करण्यात आला असून लाकूड मालासह ट्रक जप्त केला असल्याचे सांगण्यात आले.
सदरची कारवाई ही एन.आर.प्रवीण (मुख्य वनसंरक्षक [प्रा] पुणे), धैर्यशील पाटील (उपवनसंरक्षक,सोलापूर) व बी.जी.हाके (सहाय्यक वनसंरक्षक,(कॅम्प) सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली तुकाराम विठ्ठल जाधवर (वनपरिक्षेत्र अधिकारी,सांगोला),एस.एल.वाघमोडे (वनपाल,जुनोनी),एस.एस.मुंढे (वनरक्षक,घेरडी), आर.एस.करताडे (वनमजूर,घेरडी) यांनी केली.
———————————————————————
वन गुन्हा होत असल्यास संपर्क साधावा :
याद्वारे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, मालकी क्षेत्रातील वृक्षतोड करण्यापूर्वी वृक्षअधिकारी तथा वनपरिक्षेत्र अधिकारी,सांगोला यांचा वृक्षतोड परवाना व वाहतूक परवाना घेतल्यानंतरच सदरची वृक्षतोड व वाहतूक करावी.तसेच मालकी क्षेत्रात किंवा वनक्षेत्रात कोणत्याही प्रकारचा वन गुन्हा होत असल्यास कृपया, ९४२०३७८२७९ या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. – तुकाराम विठ्ठल जाधवर (वनपरिक्षेत्र अधिकारी,सांगोला)—————————————————————————
More Stories
दागिने व मोटार सायकल चोरी करणार्या सराईत गुन्हेगारास पकडण्यात सांगोला पोलीसांना यश
तब्बल २५ तोळे सोन्यासह आरोपीला पकडण्यात सांगोला पोलीसांना यश
चोरीला गेलेले तब्बल ३६ लाखांचे १४५ मोबाईल सांगोला पोलीसांनी दिले शोधून