आरोग्य

सांगोल्यात खंडागळे हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर

 

सांगोला :

सांगोला शहरातील कडलास रोडवरील खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने रविवारी ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते २ या दरम्यान महिलांसाठी मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डाॅ.परेश खंडागळे यांनी दिली.

सदर शिबिरामध्ये महिला रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येणार असून रक्त तपासणीसाठी ५० टक्के सवलत,मेडिकल मध्ये १० टक्के सवलत,ऑपरेशनची गरज पडल्यास ३० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तरी,या शिबिराचा सांगोला शहर व तालुक्यातील गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन डॉ.परेश खंडागळे यांनी केले आहे.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button