आरोग्य

केदार हॉस्पिटलच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर पंधरवडा

 

सांगोला :

सांगोला येथील केदार हॉस्पिटलच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त दि.१५ ते ३० डिसेंबर दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबीर पंधरवडा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती डाॅ.निरंजन केदार यांनी दिली.

या शिबिरात स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र तज्ञ,मेडिसिन-आय. सी.यु.तज्ञ,मूत्ररोग तज्ञ डॉक्टर उपलब्ध राहणार असून तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत स्त्रीरोग,हृदयरोग-उच्चरक्तदाब, मूत्ररोग निदान तपासणी शिबिर पार पडणार आहे. डॉ.दिव्यता केदार (एम.एस.स्त्रीरोग-प्रसूतीशास्त्र तज्ञ) यांचेमार्फत स्त्रियांचे सर्व प्रकारचे आजार,मासिक पाळीचे आजार,गरोदर स्त्री तपासणी,स्त्री-पुरुष वंध्यत्व,गर्भाशय पिशवीचे आजार इ.आजारांवर मोफत तपासणी होणार आहे.

तसेच डॉ.निरंजन केदार (एम.डी.मेडिसिन) व मूत्ररोग तज्ञ डॉक्टर यांचेमार्फत हृदयरोग,उच्च रक्तदाब,मधुमेह, दमा,थायरॉईड,श्वसनाचे आजार,पोटाचे आजार, मेंदूरोग,मूत्ररोग,मुतखडा,प्रोस्टेट ग्रंथीचीसूज,मूत्राशयाचे आजार,किडनीचे आजार,किडनीतील खडे,मूत्रवाहिनी मधील खडे,मूत्राशयातील खडे,मूत्रमार्गातील खडे व अन्य मूत्रविकार या सर्व आजारांवर मोफत तपासणी व निदान केले जाणार आहे.केदार लॅबोरेटरी मार्फत मोफत हृदयाची तपासणी इ.सी.जी.,मोफत रक्त तपासणी,सी.बी.सी.रक्तातील हिमोग्लोबिन,साखर, रक्तगट तपासणी केली जाणार आहे.

तरी,सांगोला तालुक्यातील व पंचक्रोशीतील सर्व गोरगरीब व गरजू रुग्णांनी १५ डिसेंबर ते ३० डिसेंबर या पंधरवड्यात या शिबिराचा लाभ घ्यावा,असे आवाहन डॉ.निरंजन केदार यांनी केले आहे.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button