सांगोला :
श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक व ज्येष्ठ नागरिक संघटनेचे माजी अध्यक्ष कै.रामदास भोसले गुरुजी यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त शुक्रवारी १५ डिसेंबर रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
कै.रामदास भोसले गुरुजी यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त सांगोला तालुक्यातील धायटी येथे शुक्रवारी सकाळी ९ ते १०.३० वा.चे दरम्यान पंचक्रोशीतील भजनी मंडळी यांच्यावतीने भजन कार्यक्रम संपन्न होणार आहे. तसेच ह.भ.प.राहुल डुंबरे महाराज,नाशिककर यांचा सकाळी १०.३० ते दुपारी १२ वाजे पर्यंत किर्तनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी पुष्पवृष्टीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
तरी,या कार्यक्रमासाठी सांगोला, धायटी व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन लक्ष्मण सदाशिव भोसले,माणिक सदाशिव भोसले,डॉ.शिवराज रामदास भोसले,संजय रामदास भोसले व भोसले परिवाराचे वतीने करण्यात आले आहे.
——————————————————————————
More Stories
विद्यार्थ्यांना मोबाईल व समाज माध्यमांपासून दूर ठेवणे ही काळाची गरज – सहाय्यक प्रांतपाल डॉ.कैलास करंडे
सांगोला येथील भारतीय स्त्री शक्ती संस्थेला राज्य महिला आयोगाचा राज्यस्तरीय पुरस्कार
आपुलकी प्रतिष्ठानचा गुंफण सामाजिक पुरस्काराने गौरव